मुक्तपीठ टीम
सत्तेच्या मोहाने उद्योग क्षेत्रातील बाप-बेटे राजकीय बुवाच्या नादाला लागले आणि घरच्या लक्ष्मीला अवदसा ठरवत अमानुष छळ करु लागले. आधी त्यांना जादूटोण्याचे सल्ले देणारा राजकीय बुवा येमूल गजाआड केला त्यानंतर आता गणेश गायकवाड आणि वडिल नाना गायकवाड यांना जेरबंद करण्यात आलंय. पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्या बरोबरच विकृत छळ आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मोक्का लावल्यानंतर काही तासाच्या आत पुणे पोलिसांनी गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांना कर्नाटकातील उडुपीतून अटक केली. गेले दीड महिना हे पिता पुत्र फरार होते.
सत्ता, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी!
- पुण्यातील उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड याच्यावर गंभीर आरोप आहेत.
- त्याने ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला.
- गणेश गायकवाड याने आपल्या २७ वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली होती.
- पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता.
- विशेष म्हणजे गणेश गायकवाड याची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे.
- तीन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
- पण येमुले गुरुच्या सल्ल्यामुळे त्यांच्या संसाराचा खेळ खंडोबा झाला.
मोक्का अंतर्गत कारवाई
- पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी पिता-पुत्र पाहिजे होते.
- त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
- पण आरोपी फरार होते. त्यांचा पोलीस शोध घेत होते.
- गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी दक्षिणेत इरत असल्याचे पोलिसांना तपासात आढळले.
- तो तिरुपतीला गेल्याचे आढळले होते.
- शेवटी दक्षिणेत त्यांना पकडण्याचा पोलिसांना यश आले.
सत्तेचा मोह, बुवाबाजीची अंधश्रद्धा, गुन्ह्यांची मालिका!
- नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.
- त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे,
- गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे,
- कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे,
- खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे,
- दरोडा घालणे.
- संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
राजकीय स्वार्थासाठी बुवाबाजीच्य नादाने पत्नीचा छळ
- गणेश नानासाहेब गायकवाड प्रसिद्ध उद्योजक
- गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो.
- प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे.
- औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत.
- यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.
- काही दिवसांपूर्वी त्याने भाजपाला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
- पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत.
उद्योगी नेता, बुवाबाजीचा गुलाम!
- पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला तेव्हा या प्रकरणातील राजकीय गुरू येमुलचं कनेक्शन समोर आलं.
- येमुल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढर्या पाय गुणांची आहे, असे भडकवले.
- तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत.
- जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस.
- त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे पिडितेचा पती गणेशला सांगितले.
- त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला.
- यामुळे संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याच्या कारणावरून येमुल गुरूजीस अटक करण्यात आलीय.