मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या भयावह संकटात लसीकरण हा एकच मार्ग संपूर्ण जगासमोर आहे. मात्र असं असताना भारतात लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात मतभेद होताना दिसत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी केंद्राला लसींच्या तुटवड्यावर महत्वाचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लस उत्पादक कंपन्यांशिवाय देशातील इतर कंपन्यानाही कोरोना लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावे असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
लस टंचाई १५ दिवसात दूर करण्याचा गडकरींचा महामार्ग
- नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला आहे.
- “जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका ऐवजी दहा कंपन्यांना कोरोनाची लस बनविण्याचे परवाना द्या.
- या कंपन्याना देशात पुरवठा करू द्या त्यानंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करा.
- हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते.
अंत्यसंस्कारासाठीही दिला सल्ला
- चंदनाच्या लाकडा ऐवजी डिझेल, इथेनॉल, बायोगॅस इंधन आणि वीजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कारासाठी लागणार खर्च कमी होईल.
- डिझेलचा वापर केला तर १६०० रुपये, एलपीजीचा वापर केला तर १२०० रुपये, विजेचा वापर केल्यास ७५०-८०० रुपये आणि बायोगॅसचा वापर केल्यास एक हजार रुपये खर्च येतो.
- बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत आहेत.