Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता परवाना किंवा नोंदणीशिवाय अन्नपदार्थ विकता येणार नाहीत! नाहीतर दंड-तुरुंगवास!

अन्नपदार्थ व्यावसायिकांनी कसे मिळवावे परवाने किंवा कशी करावी नोंदणी? जाणून घ्या...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fssai1

मुक्तपीठ टीम

आता देशभरात कुठेही परवाना किंवा नोंदणीशिवाय अन्नपदार्थ विकता येणार नाहीत, असा मोठा बदल झाला आहे. FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन निर्देश जारी केला आहे. सर्व दुकानदारांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाना घेणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे. छोट्या दुकानदारांपासुन रेस्टॉरंट पर्यंत सर्वांना कोणत्या खाद्यपदार्थांचा वापर केला जात आहे हे प्रदर्शित करावे लागेल. आदेशाचे पालन न केल्यास दुकानदारा विरोधात कारवाई केली जाईल ज्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत परंतु त्यांनी नोंदणी केलेली आहे अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा. बृहन्मुंबई विभागातर्फे दि. १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत अन्न व्यावसायिकांकडील परवाना, नोंदणी तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व अन्न व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग यांनी केले आहे.

खाद्यपदार्थांच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक आवश्यक

  • FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन निर्देश जारी केला आहे.
  • सर्व दुकानदारांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाना घेणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • खाद्यपदार्थांच्या बिलावर FSSAI चा नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे, असे निर्देशात नमुद करण्यात आले आहे.
  • छोट्या दुकानदारांपासुन रेस्टॉरंट पर्यंत सर्वांना कोणत्या खाद्यपदार्थांचा वापर केला जात आहे हे प्रदर्शित करावे लागेल.
  • आदेशाचे पालन न केल्यास दुकानदारा विरोधात कारवाई केली जाईल ज्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

 

  • अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना सावध केले आहे.
  • अन्न व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाअंतर्गत परवाना/नोंदणी करुनच अन्न व्यवसाय करावा.
  • ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे.
  • ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी.
  • जे अन्न व्यावसायिक विना परवाना/नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून, त्यामध्ये पाच लाखापर्यंत दंडाची व सहा महिने कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे.

 

परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीकरीता अर्ज करण्यासाठी www.foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असून त्याठिकाणी लागणारी कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जेणेकरून कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करता येईल. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने केले आहे.


Tags: foodfssailicenseregistrationफूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाबृहन्मुंबई विभागरेस्टॉरंट
Previous Post

पुण्याच्या सीबीआयसीमध्ये गुप्तचर अधिकाऱ्यांच्या ६ जागांवर करिअर संधी

Next Post

“कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन व शिक्षणप्रणाली राबविण्यात यावी”: दादाजी भुसे

Next Post
Dadaji Bhuse

"कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन व शिक्षणप्रणाली राबविण्यात यावी": दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!