मुक्तपीठ टीम
तुम्ही पराठे खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला आता त्यावर १८ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. तर रोटीवर ५ टक्के जीएसटी मोजावे लागणार आहे. अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीजने दाखल केलेल्या अपीलवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, चपाती आणि पराठ्यामध्ये खूर फरक आहे. पराठ्यामध्ये भाज्यांचा वापर केला जातो त्यामुळे त्याची किंमत चपातीच्या तुलनेत जास्त आकारण्यात येईल. त्यामुळे आता गुजरातमध्ये पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी असणार आहे. वाडीलाल इंडस्ट्रीजने ही कंपनी अनेक प्रकारचे रेडी टू कूक म्हणजेच फ्रोजन पराठे बनवते.
एएएआरने कंपनीचा युक्तिवाद फेटाळला…
- अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीज या कंपनीने पराठ्यावरील जीएसटी कमी करण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती.
- रोटी आणि पराठामध्ये फारसा फरक नाही, असा युक्तिवाद कंपनीने केला.
- दोन्ही पिठापासून बनवलेले असतात, त्यामुळे पराठ्यावरही ५ टक्के जीएसटी असावा.
- एएएआरने कंपनीचा हा युक्तिवाद फेटाळून लावत पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लागेल असं स्पष्ट केलं.
पराठे रोटीच्या श्रेणीत येतात…
- याचिकाकर्त्यानी युक्तीवाद केला की, त्यांची कंपनी ८ प्रकारचे फ्रोझन पराठे बनवते. ज्यात मलबार पराठा, मिक्स पराठा, व्हेज पराठा, कांदा पराठा, प्लेन पराठा, आलू पराठा, लच्छा पराठा यांचा समावेश आहे.
- यामध्ये प्रामुख्याने गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो.
- हे पराठे रोटीच्या श्रेणीत येतात.
- कारण त्यात फक्त पीठ, तेल, भाजीपाला कच्चा माल म्हणून वापरला जातो.
- त्यामुळे यावर कोणताही एसजीएसटी किंवा सीजीएसटी लावू नये.
रोटी आणि पराठा यांच्यात मोठा फरक: एएएआर
- एएएआरने म्हटले आहे की अपीलकर्त्याद्वारे पुरवले जाणारे पराठे रोटीपेक्षा वेगळे आहेत.
- साध्या रोटीच्या श्रेणीत याचा विचार केला जाऊ शकत नाही, ज्याला GAAR (सामान्य अँटी-अव्हॉइडन्स नियम) द्वारे देखील समर्थन दिले गेले आहे.
- GAAR ने गुजरातच्या अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगच्या जून २०२१ च्या आदेशाचे प्रभावीपणे समर्थन केले आहे, ज्यात असे म्हटले होते की असे पॅकेज केलेले पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत ३-४ मिनिटे शिजवले जाणे आवश्यक आहे आणि रोटी आणि पराठ्यात फरक आहे.