मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या भीषण दुसर्या लाटेचा सामना करतानाच लसींच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतासाठी आनंदाची बातमी आहे. देशात तयार केल्या गेलेल्या दोन लसींचे लसाकरण सध्या सुरू आहे, तर लवकरच या लसीकरण मोहिमेत आयात केलेल्या स्पुतनिक व्ही या लसीचाही समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच जुलैपासून या लसीचे भारतात उत्पादन सुरु होणार आहे.
स्पुतनिक व्ही या रशियन लसीला देशात मंजूरी देण्यात आली आहे. लसीची आयात सुरू झाली आहे. लवकरच तिला लसीकरण मोहिमेत समाविष्ट करून डोस देण्यासही सुरूवात केली जाईल. या महिन्याच्या अखेरीस, आणखी तीस लाख स्पुतनिक लस पूरक भारतात दाखल होतील. याशिवाय देशात डॉ. रेड्डी लॅबसह इतर पाच कंपन्यांसमवेत या लसीचे उत्पादन सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
कोणत्या कंपन्या करणार ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन?
1. डॉ. रेड्डी लॅबोरेटरी
2. हेटरो बायोफार्मा
3. व्हर्चोव बायोटेक
4. स्टेलिस बायोफार्मा
5. ग्लॅंड बायोफार्मा
6. पॅनासिया बायोटेकचा
जुलैपासून देशव्यापी स्पुतनिक व्ही लस सुरू होईल असा प्रयत्न आहे.