मुक्तपीठ टीम
नरेंद्र मोदी यांचे भाषण आज लसटंचाईशी झुंज देणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते राज्य सरकारांपर्यंत सर्वांनाच दिलासा देणारे ठरले. त्यांनी देशात २१ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची घोषणा केली. २१ ते ४४ वर्षांपर्यंतच्या युवावर्गासाठीही आता केंद्र सरकारच लसी पुरवणार आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील लसीकरणासाठीच केंद्र सरकार लस पुरवत होते. आता देशात उत्पादन झालेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार विकत घेणार आहे. उरलेल्या २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना दिल्या जातील. त्यांनी लसींच्या किंमतीपेक्षा फक्त १५० रुपयेच जास्त घ्यावेत असे निर्बंध असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. कोरोनाविरोधातील युद्धासाठी त्या घोषणा महत्वाच्या आहेत.
देशातील २१ वर्षांवरील प्रत्येकाला मोफत लस
- योग दिनापासून म्हणजेच २१ जूनपासून केंद्र सरकारतर्फे देशातील २१ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाईल.
- कोणत्याही लसीवर कोणत्याही राज्य सरकारला खर्च करावा लागणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
- आतापर्यंत देशातील कोट्यवधी लोकांना विनामूल्य लस दिली गेली आहे आणि आता १८ वर्षांवरील युवावर्गदेखील लाभार्थी होतील.
- कोरोना लसबाबत निर्माण झालेल्या गैरसमजांवर ते म्हणाले की, कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
- देशातील प्रत्येकाने ही लस घ्यावी आणि समाजातील प्रत्येकाने ही लस घ्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवली
- जगातील अनेक देशांमध्ये लसीची मागणी जास्त आहे आणि लस बनविणार्या कंपन्या कमी आहेत.
- भारताकडे स्वतःची लस नसती तर परिस्थिती वेगळी असती.
- मागील ६० वर्षांचा इतिहास सांगतो की जगात लस आल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर लस यायची.
- पंतप्रधान म्हणाले की सन २०१४मध्ये मध्ये लसीकरणाची व्याप्ती केवळ 60 टक्के होते.
- जर या वेगाने वाढ झाली असती तर देशाला लसी देण्यास ४० वर्षे लागली असती.
- आम्ही लसीकरण गती वाढविली आणि व्याप्ती देखील वाढविली.
- एकाच वर्षात भारताने दोन लस तयार केल्या आणि आतापर्यंत २३ कोटी लस डोस देण्यात आले आहेत.