मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७ जून रोजी जाहीर केल्याप्रमाणे आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण आहे. महाराष्ट्रात याआधीही सरकारी लसीकरण हे मोफतच होते, पण जेथे नव्हते त्या राज्यांमध्येही आता सरकारी केंद्रांवर लसीकरणासाठी पैसे मोजण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.
लसीकरणातले नवे बदल काय आहेत?
- आतापर्यंत महाराष्ट्रासारखे अपवाद वगळता काही राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटाल्या नागरिकांना लसीकरणासाठी पैसे मोजावे लागत होते.
- आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण होणार आहे.
- आतापर्यंत केंद्र सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ५० टक्के डोस विकत घेत होती.
- आता हाच आकडा ७५ टक्क्यांवर पोहोचणार आहे.
- राज्य सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून २५ टक्के डोस विकत घेत होती. आता केंद्र सरकारच या लसी विकत घेऊन राज्य सरकारांना मोफत देणार आहेत.
- खासगी रुग्णालयं लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून आधीच्या नियमांप्रमाणेच २५ टक्के लसी विकत घेऊ शकतात.
खासगी रुग्णालयांमध्ये लसींच्या किंमती किती असणार?
लस – कोविशिल्ड
- मूळ किंमत – ६०० रुपये
- जीएसटी – ३० रुपये
- सर्विस चार्ज- १५० रुपये
- एकूण किंमत – ७८० रुपये
लस – कोवॅक्सिन
- मूळ किंमत – १२०० रुपये
- जीएसटी – ६० रुपये
- सर्विस चार्ज- १५० रुपये
- एकूण किंमत – १४० रुपये
लस – स्पुटनिक व्ही
- मूळ किंमत – ९४८ रुपये
- जीएसटी – ४७ रुपये
- सर्विस चार्ज- १५० रुपये
- एकूण किंमत – ११४५ रुपये
राज्यांना किती लसींचा पुरवठा होणार?
- राज्याची लोकसंख्या, कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि लसीकरणाचा वेग पाहून केंद्राकडून राज्याला लसींचा पुरवठा केला जाईल.
- त्यासोबतच राज्याने लसी वाया घालवल्यास त्वरित लसींचा पुरवठा थांबवला जाईल.
- केंद्रांना राज्यांना आधीच किती लसी मिळणार, याची कल्पना दिलेली आहे.
- जेणेकरुन राज्यांना त्या पद्धतीने तयारी करण्याचा वेळ देण्यात आला आहे.
आता थेट लसीकरण केंद्रावरही नोंदणी
- सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरणाची व्यवस्था
- लसीकरणासाठी कोविन ऍपची नोंदणी आवश्यक आहे.
- मात्र केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येईल.
- आर्थिकदृष्ट्या कमकुत गटासाठीही ई-वाऊचरची व्यवस्था करण्यात आली आहे.
- या वाऊचरमुळे गरिबांना खासगी रुग्णालयातही मोफत लसीकरण करता येईल.
- ज्या व्यक्तीच्या नावावर वाऊचर असेल, त्यालाच लस मिळेल.