मुक्तपीठ टीम
कोरोनाविरोधातील लढ्यात सातत्यानं मोठा वाटा उचलत असलेल्या टाटा समुहाच्या विस्तारा एअरलाईन्सने आरोग्य रक्षकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांना विस्ताराने आपली खास ऑफर कळवली आहे. खास बात अशी की ही ऑफर संपूर्ण निशुल्क आहे. कोरोना संकटकाळात काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सना विस्ताराच्या विमानांमधून देशभर मोफत विमान प्रवास करता येणार आहे. विस्ताराच्या विमानांमध्ये उपलब्ध जागांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल, असे विस्तारा एअरलाइन्सने पाधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
सरकारी संस्था आणि रुग्णालयांची तातडीची गरज लक्षात घेऊन विस्तारा विमानांमधून मालवाहतुकीचीही निशुल्क सेवा पुरवणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सना देशभरात मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा प्रस्तावही कंपनीने ठेवला आहे. उषा पाधी यांनी त्यांना विस्ताराचे असे पत्र आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. आपण सगळे मिळून या संकटाचा सामना करुया, असे पाधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या प्रकारच्या जागा मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या आधारावर आरोग्य रक्षकांना ही सुविधा देण्यात येईल, अशी माहिती विस्तारानं दिली आहे.
We’re here to help. If you belong to any government organisation that needs air logistic assistance to fight the pandemic, please send in a request to nationalrelief@airvistara.com. #ThisIsTata pic.twitter.com/sEkBHA9HKk
— Tata Group (@TataCompanies) April 26, 2021
टाटा आहे तर सेवेचा विश्वास आहे!
• विस्तारा एअरलाइन्स हा टाटासन्सचा संयुक्त उपक्रम
• विस्तारा एअरलाइन्स हा टाटासन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे.
• २०१५ पासून भारतात ही एअरलाइन्स सुरू झाली.
• देशातली बिकट परिस्थिती पाहून अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी शक्य तो मदतीचा हात पुढे केला आहे.
• त्यात टाटा समुहातील कंपन्या आघाडीवर आहेत.
पाहा व्हिडीओ: