गौरव संतोष पाटील / पालघर
केळवे बीच वरील समुद्रात पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुले भरतीच्या प्रवाहात बुडत असताना त्यांना नाशिकमधून फिरायला आलेल्या चार विद्यार्थ्यांनी वाचविण्याच्या प्रयत्नात स्थानिक एका विद्यार्थ्यांसह नाशिक येथील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले असून केळवे सागरी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत
केळवे बीच जवळील देवीचा पाडा येथील ४-५ स्थानिक अल्पवयीन मुले समुद्रात पोहायला गेली होती. त्याच वेळी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीत ही मुले बुडू लागली. त्याच दरम्यान नाशिक येथील ब्रह्मवेली नामक खाजगी कॉलेजमधील काही विद्यार्थी पोहत होते.त्यावेळी काही अल्पवयीन मुले समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर कृष्णा शेलार, दीपक वडाकाते, ओम दिपक विसपुते, आणि अखिलेश देवरे या चार विद्यार्थ्यांनी त्या पुन्हा बुडणाऱ्या मुलाच्या दिशेने झेप घेतली. ह्यावेळी समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली.
ह्यातील अखिलेश देवरे ह्याला वाचविण्यात यश आले असून स्थानिक मुलगा अथर्व नाकरे(वय १३वर्ष)रा.देवी पाडा, केळवे ह्याचा आणि नाशिकच्या ब्रह्मव्हॅली स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांचा अश्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आला आहे.
दरम्यान अभिलेख देवरे वय.१७ वर्षे रा. नाशिक यास सुखरूप वाचवण्यात यश आले असून,
- अथर्व नाकरे वय.१३ वर्षे रा. केळवा ( इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी आदर्श विद्यामंदिर केळवा )
- कृष्णा शेलार वय. १७ वर्षे रा. नाशिक( ब्रह्मा व्हॅली नाशिक इयत्ता११ वी सायन्स मध्ये शिकणारा विद्यार्थी)
- दीपक वडकाते वय.१७ वर्षे रा. नाशिक ( ब्रह्मा व्हॅली नाशिक इयत्ता११ वी सायन्स मध्ये शिकणारा विद्यार्थी)
- ओम विसपुते वय.१७ वर्षे रा. नाशिक ( ब्रह्मा व्हॅली नाशिक इयत्ता११ वी सायन्स मध्ये शिकणारा विद्यार्थी)
या चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी माहीम च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याची माहिती केळवे पोलिसांनी दिली. ३९ विद्यार्थी आणि सहा शिक्षक ब्रह्म वेली नाशिकचे केळवे येथे फिरायला आले होते