मुक्तपीठ टीम
आपल्या महाराष्ट्रातील मिरज शहरातील तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा काही शतकांची. मिरजेच्या कारागिरांनी बनवलेलं एक तरी देशी तंतुवादय जगभरातील अनेक नामांकित कलाकारांनी वाजवलेलं असतं. आता या कारागिरांनी पहिल्यांदाच हार्प हे विदेशी तंतुवाद्य बनवलंय.
मिरजमधील सतारमेकर गल्ली ही तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देशी विदेशी तंतुवाद्य तयार करण्याचा हतकांडा असल्याने इथे तयार केलेले तंतुवाद्यांला जगाच्या कानाकोपऱ्यात मोठी मागणी आहे. आज देशी तंतुवाद्यसोबत विदेशी तंतुवाद्य तयार करण्याचा बहुमान जीएस मुझिकल्सला मिळाला आहे. देशी विदेशी तंतुवाद्य तयार करण्यात जीएस मुझिकल्स टीमची तंतुवाद्य निर्मितीमध्ये चौथी पिढी कार्यरत आहे.
वाद्य निर्मितीमध्ये हातांकडा असल्याने देशातील नामांकित सांस्कृतिक संस्थेने पाच महिन्यांपूर्वी हार्प हे विदेशी तंतुवाद्य तयार करण्याची मागणी जीएस मुझिकल्सकडे केली होती. अमेरिका कॅनडा आणि पाश्चात्य देशात इसवीसन पूर्व ३ हजार वर्षापूर्वीपासून हार्प तंतुवाद्य वाजवले जायचे याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात पाहायला मिळतो. विदेशात हे तंतुवाद्य तयार केले जात असल्याने देशात या तंतुवाद्यांची निर्मिती कधी झाली नाही. पण जीएस मुझिकल्स टीमने पाच महिने अथक परिश्रम करून सहा फुटी आणि ४० स्वरांचा भारतीय बनावटीचं हार्प तंतुवाद्य तयार करण्यात यश मिळवलं आहे. पाश्चात्य रोमन हस्तशिल्पाचं या हार्पवर कोरीव काम करण्यात आलं आहे. भारतात पहिल्यांदा भारतीय बनावटीचा हार्प तयार करण्यात आल्याने मिरजेच्या नावलौकिकात भर पडली आहे.