Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटीआयमधील मुलींना कोडिंग कौशल्य प्रशिक्षण, फ्लाइट प्रकल्पाचा शुभारंभ

November 19, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
FLIGHT programme

मुक्तपीठ टीम 

राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आणि यूएन वुमेन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) मुलींसाठी फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आयटीआयमधील मुलींना कोडींग तसेच इतर सॉफ्ट स्किल्स शिकविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा नुकताच ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, यूएन वुमनच्या वरिष्ठ अधिकारी कांता सिंह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, युएन वुमेनच्या रुतुजा पानगांवकर, श्रीमती सुजान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

FLIGHT programme             

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी फ्लाईट कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे आयटीआयकडे मुलींचा ओढा वाढेल व त्या माध्यमातून त्यांना कौशल्य विकास तसेच रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

FLIGHT programme             

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींचे प्रवेश, मुलींचा ओढा वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये  महिलांना प्रोत्साहन देणारे तसेच त्यांच्या यशाच्या वाटेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी सक्षमीकरण साध्य करणे  महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तसेच वरिष्ठ नेतृत्व पदांवर महिलांचे अधिक चांगले प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणातील महिलांच्या  प्रगतीपथावरील अडथळे दूर करून महिलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने  फ्लाईट कार्यक्रम एक प्रभावी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            

दादर येथील महिला आयटीआयमधील विद्यार्थिनी आरती चंद्रनारायण म्हणाली की, FLIGHT कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थिनीला रोजगाराची संधी मिळेल.  आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलींनी पुढे यावे असे आवाहन तिने केले.

            

फ्लाइट कार्यक्रमामध्ये राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पॉलिटेक्निक आणि महाविद्यालये सहभागी होणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, यूएन वुमेन, त्यांचे समन्वयक व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या इतर संस्था यांचा संयुक्त सहभाग फ्लाइट कार्यक्रमात असणार आहे. स्त्री- पुरुष समानता  आणि महिला सक्षमीकरणासाठी, विशेषतः कौशल्यपूर्ण शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या विषयाशी निगडीत क्षेत्रांमध्ये यंत्रणा मजबूत करण्यासाठी कोशल्य विकास विभाग आणि यूएन वुमेन यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्याअंतर्गत फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  फ्लाईट  कार्यक्रमाला PROSUS गटाकडून निधी  उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी PRDAAN आणि B-ABLE हे सहभाग देणार आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: B-ABLEDepartment of Skill DevelopmentEmployment and EntrepreneurshipFlight projectITINawab MalikPRDAANPROSUSUN Womenआयटीआयकौशल्य विकासनवाब मलिकफ्लाइट प्रकल्पयूएन वुमेनरोजगार आणि उद्योजकता विभाग
Previous Post

रेल्वे स्थानकांवर राहण्याची व्यवस्था, कसं आहे पॉड हॉटेल, किती भाडे, कोणत्या सुविधा?

Next Post

इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये ‘बाऊन्स इन्फिनीटी’चा नवा ट्रेंड, बॅटरीसह किंवा विना मिळणार स्कूटर!

Next Post
infinity scooter

इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये ‘बाऊन्स इन्फिनीटी’चा नवा ट्रेंड, बॅटरीसह किंवा विना मिळणार स्कूटर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!