Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेने जाहीर केलेल्या पाच कुख्यात भारतीय बाजारांमध्ये मुंबईतील ‘हा’ बाजारही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
USTR

मुक्तपीठ टीम

अमेरिका आपल्या कंपन्यांच्या व्यावसायिक हिताचं रक्षण करण्यासाठी जगभरातील मुख्य बाजारांवर लक्ष ठेवत असते. त्यातून ज्या बाजारांमध्ये बनावट वस्तू विकल्या जातात, त्यांची यादी कुख्यात बाजार म्हणून प्रकाशित केली जाते.यावेळी भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट पाच बाजारांचा समावेश या यादीत आहे. त्यात मुंपईतीलही एका बाजाराचा समावेश आहे.

 

या यादीत मुंबईतील हिरापन्ना, इंडियामार्ट ऑनलाइन पोर्टल आणि नवी दिल्लीच्या प्रसिद्ध पालिका बाजारांचाही समावेश आहे. या पाच भारतीय बाजारांना अमेरिकेने कुख्यात असे म्हटले आहे. यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच यूएसटीआरने प्रसिद्ध केलेल्या जगातील कुख्यात बाजारांच्या ताज्या वार्षिक यादीमध्ये या बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. २०२१ वर्षासाठी जाहीर झालेल्या या यादीमध्ये जगभरातील ४२ ऑनलाइन आणि ३५ पारंपारिक बाजारपेठांचा समावेश आहे जे ट्रेडमार्क बनावट किंवा कॉपीराइट चोरीमध्ये गुंतलेले आहेत.

 

अमेरिकेने जाहीर केलेले भारतातील कुख्यात बाजार

  • मुंबईतील हिरा पन्ना, कोलकातामधील किदारपूर आणि दिल्लीतील टँक रोड, दिल्लीतील पालिका बाजार, ऑनलाइन इंडिया मार्ट या यादीत समाविष्ट असलेल्या इतर तीन भारतीय बाजारपेठा आहेत.
  • अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई म्हणाले की, “बनावट आणि पायरेटेड वस्तूंचा जागतिक व्यापार अमेरिकन नवकल्पनांना आणि रचनात्मकतेला कमकूवत करतो आणि अमेरिकन कामगारांना नुकसान पोहोचवतो.”
  • ई-कॉमर्स वेबसाइट इंडियामार्टवर मोठ्या प्रमाणात बनावट फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांची विक्री करत असल्याचा आरोप आहे.
  • मुंबईच्या हिरा पन्ना मार्केटमध्ये बनावट घड्याळे, शूज आणि सौंदर्यप्रसाधने मिळतात. तेथे विकले जाणारे बनावट सौंदर्य प्रसाधने त्वचेच्या गंभीर समस्या, जळजळ आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
  • कोलकात्याच्या किदारपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे मोठ्या ब्रँडच्या नावाखाली बनावट कपडे आणि सौंदर्यप्रसाधने विकली जातात.
  • दिल्लीचा पालिका बाजारही कुख्यात बाजारपेठांच्या यादीत आहे. राष्ट्रीय राजधानीतील हे भूमिगत बाजार बनावट मोबाइल अॅक्सेसरीज, सौंदर्यप्रसाधने, घड्याळे आणि आयवेअरच्या कथित विक्रीसाठी ओळखले जाते.
  • येथे मोठ्या प्रमाणात खरेदीदार विद्यार्थी आणि तरुण आहेत ज्यांना परवडणाऱ्या किंमतीत आधुनिक उत्पादने हवी आहेत.
  • दिल्लीचे टँक रोड मार्केटही बनावट उत्पादनांसाठीही ओळखले जाते.

 

कुख्यात बाजारपेठांची यादी २०११ पासून होत आहे जाहीर

  • यूएसटीआरने २००६ मध्ये प्रथम अशा कुख्यात बाजारांची ओळख पटवली.
  • फेब्रुवारी २०११ पासून, सार्वजनिक जागरूकता वाढवण्यासाठी ते कुख्यात बाजारांची यादी वार्षिक आधारावर जाहीर करत आहे.

 

अलीबाबा आणि टेनेसेंटद्वारे चालवल्या जाणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सचा कुख्यात बाजारपेठांमध्ये समावेश

  • अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अलीबाबा आणि टेनेसेंटद्वारे चालवल्या जाणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचाही कुख्यात बाजारांच्या यादीत समावेश केला आहे.
  • यामध्ये अलीएक्सप्रेस आणि वीचॅट यांचाही समावेश आहे.
  • अलीएक्सप्रेस ही अलीबाबाच्या मालकीची आहे, तर टेनसेंट ही वीचॅटची मूळ कंपनी आहे.

 

बनावट वस्तूंमुळे दरवर्षी एक लाख कोटींचे नुकसान

सर्टिफिकेशन इंडस्ट्री असोसिएशन (एएसपीए) नुसार, बनावट उत्पादनांमुळे देशाला दरवर्षी एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे. जागरूकता आणि देखरेखीचा वापर करून अशा उत्पादनांवर ५० टक्के बंदी घातली तर भारताची वार्षिक ५० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा संघटनेचा विश्वास आहे. बहुतांश बनावट औषधे भारतात बनतात. गेल्या काही वर्षांत जगातील व्यापारातील बनावट वस्तूंचा वाटा ३.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.


Tags: good newsIndia notorious marketIndiamart Online PortalmuktpeethMumbai HirapannaNew Delhi Famous Palika BazaarUSUS Trade RepresentativeUSTRअमेरिकाइंडियामार्ट ऑनलाइन पोर्टलचांगली बातमीनवी दिल्ली प्रसिद्ध पालिका बाजारभारत कुख्यात बाजारमुक्तपीठमुंबई हिरापन्नायूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हयूएसटीआर
Previous Post

बेस्टच्या ९०० ई बसेसच्या ३६०० कोटींच्या कंत्राटात घोटाळा – मिहिर कोटेचा

Next Post

मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक…शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मांडलं तळकोकणाचं रक्तचरित्र! गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी!!

Next Post
narayan vinayak

मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक...शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मांडलं तळकोकणाचं रक्तचरित्र! गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!