Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत मुसळधार पाऊस, एनडीआरएफच्या पाच टीम तैनात

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NDRF Team In Mumbai

मुक्तपीठ टीम

मुंबईसह, उपनगरात मुसळधार पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. मुंबईत दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अंधेरी भुयारी मार्ग बंद

सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडायला लागला. रात्रभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अंधेरी भुयारी मार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अंधेरी भुयारी मार्ग सध्या बंद केला आहे. दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअर परळ, शीव, धारावी, वांद्रे, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, काळाचौकी, दहिसर, बोरिवली, गोरेगाव, सांताक्रूझ यासह अनेक ठिकाणी पाणी साचले.

सरकार आणि यंत्रणा सुसज्ज!

  • मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • यानंतर अनेक प्रशासनाने एनडीआरएफच्या पाच तुकड्या येथे उतरवल्या आहेत.
  • तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार आणि इतर अधिकाऱ्यांची पावसाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस!

  • राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
  • राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
  • एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
  • दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

Tags: Heavy rainsmumbaiNDRFएनडीआरएफमुंबईमुसळधार पाऊस
Previous Post

केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’

Next Post

#मुक्तपीठ #Live देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जल्लोषात स्वागत

Next Post
#मुक्तपीठ #Live   देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जल्लोषात स्वागत

#मुक्तपीठ #Live देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!