मुक्तपीठ टीम
भारतातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिभा आहे, अशांसाठी भारत सरकार आणि राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. ज्याद्वारे होतकरू विद्यार्थी त्यांचे अध्यापन पूर्ण करू शकतात आणि त्यांचे जीवन दिशाहीन होण्यापासून वाचू शकते.
यूजीसी म्हणजेच यूनिव्हर्सिटी ग्रॅंट कमिशनने देशभरातील विद्यापीठांमधील संशोधन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध प्रकारच्या राष्ट्रीय फेलोशिपची घोषणा केली आहे. यूजीसीने एकूण पाच फेलोशिप योजना जाहीर केल्या आहेत. फेलोशिप आणि अनुदान संबंधित तपशीलवार माहिती यूजीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवार यूजीसी वेबसाइटला भेट देऊन अधिक तपशील मिळवू शकतात. यूजीसी सचिव प्रा. रजनीश जैन यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
यूजीसी फेलोशिप, संशोधन अनुदान याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या
- फेलोशिपचे उद्दिष्ट नियमितपणे नियुक्त केलेल्या प्राध्यापक सदस्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे.
- फेलोशिप कार्यक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे, या उपक्रमात १० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
- पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप ही विज्ञान, औषध आणि अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांसाठी आहे. फेलोशिप प्रोग्रामचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
- फेलोशिप/ संशोधन अनुदानासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रूपय आणि आकस्मिकता म्हणून ५० हजार रूपये प्रति वर्ष मिळतील.
- उमेदवारांची उच्च वयोमर्यादा ६७ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
यूजीसी फेलोशिप प्रोग्रामविषयी अधिक माहितीसाठी ugc.ac.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
यूजीसीद्वारे जारी केलेल्या पाचही फेलोशिप मिळविण्यास इच्छुक असलेले शिक्षक आणि विद्यार्थी वेळेवर यूजीसी वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. विद्यापीठ प्रशासन अर्ज करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करेल. यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढे यावे. जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यूजीसीच्या अशा योजनेमुळे संशोधनात गुणवत्ता येईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यूजीसीची फेलोशिप मिळेल.
यूजीसीद्वारे ऑफर केलेल्या पाच फेलोशिप योजनांमध्ये एस राधाकृष्णन यूजीसी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप, नवीन शिक्षकांसाठी डॉ. डी. एस कोठारी संशोधन अनुदान, सेवारत प्राध्यापकांसाठी संशोधन अनुदान, एकल मुलीसाठी एमेरिटस फेलोशिप आणि सावित्रीबाई फुले फेलोशिप यांचा समावेश आहे.