मुक्तपीठ टीम
नव्वदीच्या दशकातील अनेक अभिनेत्री आजही अभिनयासोबत त्यांच्या फिटनेसमुळे प्रसिद्ध आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्रींच्या पर्फेक्ट फिटनेसमुळे आज अनेक मुली त्यांना आपले आर्दश मानतात. अशाच वयाच्या ५८ व्या वर्षीही आपला बांधा जपलेल्या वर्षीय अभिनेत्री अनिता राज आपल्या फिटनेसमुळे चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडत आहे. इंडियन आयडॉलमध्ये त्यांना पाहिल्यावर फिटनेस चर्चेत आला. सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत अनिता राजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री अनिता राज निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी दररोज नियमित वेळेत वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करतात. त्यामध्ये वेट ट्रेनिंगसोबत क्रॉसफीट आणि पंचिंगसारख्या व्यायामाचा समावेश आहे. अनिता राज यांनी सांगितले की, ‘निरोगी, स्वस्थ राहण्यासाठी व्यायामासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. तसेच काही कारणास्तव व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तर वेगाने चालणे, पोहणे आणि आवश्यक तितकी झोप घेणे गरजेचे आहे’ असे त्यांनी सांगितले.
अनिता राज यांच्या मते, शक्ती ही शारिरिक क्षमतेतून येत नाही तर इच्छा शक्तीतून येते. त्यामुळे आपल्या शरिराचा आदर करा आणि व्यवस्थित पालनपोषण करा, असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे.
अनिता राज यांचा साठीतील तरुणाईचा फिटनेस मंत्रा!
- अनिता राज आठवड्यातून तीन दिवस कार्डियो आणि अन्य दिवसांत वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एचआयआयटी व्यायाम करतात.
- वयाच्या २५ वर्षाआधी त्यांनी वेट ट्रेनिंग करण्यास सुरुवात केली.
- महिलांनीसुद्धा वेट ट्रेनिंग करणे, वजन उचलणे गरजेचे आहे हे त्यांनी पटवून दिले आहे.
- दररोज व्यायाम केल्याने निरोगी, स्वस्थ, तंदुरस्त राहण्यास मदत होते. तसेच वयाच्या ३५ वर्षानंतरही महिला व्यायाम सुरू करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
- स्वस्थ मन हेच स्वस्थ शरीर असल्याचे त्यांनी सांगितले. जर मन निरोगी असेल, तर शरिरसुद्धा निरोगी राहते.
- सकाळी ५.३० वाजता त्या जप करताता आणि त्यानंतर व्यायामाला सुरूवात करतात.
- स्लिम ड्रीम, फिटनेस हंक अनिनेत्री अनिता राज या कोणत्याही आहारावर अवलंबून नाही.
- त्यांच्या मते, आपण व्यायाम करण्यास जितकी मेहनत घेतो, त्याचप्रमाणे आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
अनिता राज खातात तरी काय?
- अनिता राज यांच्या आहारात बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीचा समावेश असतो.
- दुपारच्या वेळी त्या मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाहीत.
- संध्याकाळी अंड्याचा पांढरा भाग आणि रात्री शेंगदाण्याचे सेवन करतात.
- त्यांच्या मते, स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.
- फीट राहण्यासाठी शक्यतो बाहेरचे फास्ट फूड न खाण्याचा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे.