मुक्तपीठ टीम
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. सतराव्या फेरीअखेर ६६,५३० मतांनी ऋतुजा लटकेंचा विजय झाला. ऋतुजा लटके यांच्याखालोखाल मतदारांनी ‘नोटा’ला मते दिली आहेत. त्यामुळे ऋतुजा यांची लढत ही अपक्षांपेक्षाही नोटाविरुद्ध असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नोटाला दहा हजारांहूनही अधिक मतं मिळाली आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली निवडणूक पार पडली.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान झाले. भाजपच्या मूरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ऋुतुजा रमेश लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. ऋतुजा लटके यांच्या या विजयानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच अनिल परब आणि अन्य शिवसेना नेत्यांचे त्यांनी आभार मानले.
विजयानंतर काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
- हा विजय माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे.
- त्यांनी अंधेरीत जी विकासकामं केली, त्याचा हा विजय आहे,’ असं ऋतुजा लटके यांनी म्हटले.
- मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना भेटून मी त्यांचेही आभार मानेन.
- नोटा हा लोकशाहीनं दिलेला पर्याय आहे. मतदारांनी आपण हे मतदान का केलं याचा विचार करावा.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली बाजी!
- शिवसेनेत पडेलेल्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन भाग झाले.
- अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयी ठरल्या.
- थोड्याचवेळात शिवसैनिक हे शिवसेना भवनात जमून या विजयाचे सेलिब्रेशन करतील.