मुक्तपीठ टीम
वैद्यकीय शिक्षणातील ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची पहिली एक्झिट परिक्षा २०२३ मध्ये घेण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी घेतला आहे. तसंच परिक्षेचे ‘मार्क रन’ हे २०२२ मध्ये होणार आहे. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्झिट परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे. या परिक्षेच्या आधारावर वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे.
- देशातील एमबीबीएसच्या सर्व विद्यार्थ्यांना एक्झिट परिक्षा देणे अनिवार्य असणार आहे.
- एक्झिट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अंतिम वर्षाच्या परिक्षेला बसण्याची गरज भासणार नाही.
- त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमानंतर एक्झिट परीक्षा ही विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा मानण्यात येईल.
वेगळ्या परिक्षेची गरज नाही…
- एक्झिट परिक्षेच्या आधारे देशातील एकूण डॉक्टरांची समान संख्या निश्चित करण्यास मदत होणार आहे.
- पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी एक्झिट परिक्षेच्याआधारे होणार आहे.
- त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांसह परदेशातून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विदयार्थ्यांनादेखील वेगळ्या परिक्षेची गरज भासणार नाही.
- केंद्रीय आरोग्य सेवांसाठी डॉक्टरांची निवडही या परिक्षेच्या आधारे होणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांमध्ये एक्झिट परिक्षेबाबत तरतूद करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी परिक्षेचा तपशील आरोग्यमंत्र्यांकडे सादर केला. प्रथमच परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी न येण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी ‘मार्क रन’ करण्याचा सल्ला दिला आहे.