मुक्तपीठ टीम
भारताचा आपला स्वत:चा पहिला स्वदेशी चिपसेट व्यावसायिकरित्या लाँच करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०२३च्या अखेरीस किंवा २०२४च्या सुरुवातीला हा चिपसेट लाँच होण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. एकदा भारताचा स्वत:चा स्वदेशी चिपसेट तयार झाला की भारतीय उद्योगांचं बाहेरच्या देशांवरील परावलंबित्व संपेल.
पहिला चिपसेट डिसेंबर २०२३ किंवा २०२४च्या सुरुवातीला उपलब्ध होणार…
- पॉवर आणि वेगा प्रोसेसरसाठी सिलिकॉनचा पहिला चिपसेट डिसेंबर २०२३ किंवा २०२४च्या सुरुवातीला उपलब्ध असेल.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली.
- ते म्हणाले की, डिजिटल इंडिया -RISC-V (DIR-V) कार्यक्रमाचा उद्देश मायक्रोप्रोसेसरच्या भावी पिढ्या तयार करणे हे आहे.
- यामुळे जे मोबिलिटी, कॉम्प्युटिंग आणि डिजिटायझेशनवर भारताच्या धोरणात्मक फोकससाठी आवश्यक गरज पूर्ण करेल.
- हे एक मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
आयआयटी मद्रास आणि सीडॅकची कामगिरी!
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत आयआयटी मद्रास आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) यांनी ओपन सोर्स आर्किटेक्चरचा वापर करून अनुक्रमे शक्ती (३२ बिट) आणि वेगा (६४ बिट) नावाचे दोन मायक्रोप्रोसेसर विकसित केले आहेत.
सेमिकंडक्टर एकोसिस्टमसाठी मोठी योजना!
- DIR-V उपक्रम हा देशातील सेमिकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यासाठी सरकारच्या ७६,००० कोटी रुपयांच्या योजनेचा एक भाग आहे.
- सरकारने IIT मद्रासचे संचालक प्रोफेसर व्ही कामकोटी यांची मुख्य आर्कीटेक्ट म्हणून आणि CDAC त्रिवेंद्रमचे वैज्ञानिक कृष्णकुमार राव यांची DIR-V कार्यक्रमाचे कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे.
- DIR-V कार्यक्रम एकात्मिक बहु-संस्थात्मक आणि बहु-स्थानिक संघासह देशात चालू असलेल्या प्रयत्नांना एकत्रित करेल आणि त्याचा लाभ घेईल.