मुक्तपीठ टीम
मुंबईतील ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला इमारतीला शनिवारी सकाळी साडे सात वाजता आग लागली. ही इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली आहे.या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,तर काही जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, ज्या सहा वृध्दांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टमची गरज आहे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कमला इमारतीला लागलेली आग ही लेवल ३ स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सर्व लोकांचे प्राण वाचले आहेत. आग विझविण्यासाठी १३ फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही.
२२ जण जखमी तर सहा मृत्यू
- कमला इमारतीला लागलेल्या आगीत २२ जण जखमी झाले आहेत.
- या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे २० ते २२ रहिवासी राहात असतील. आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, सध्या जखमींपैकी १६जणांवर उपचार सुरू आहेत तर किरकोळ जखमी जालेल्या ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं जखमींपैकी पैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
- जखमींना नायर रुग्णालय, भाटिया रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
- नायर रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.
जखमी झालेल्यांची नावे
- हंसा चोक्सी
- फालगुणी चोक्सी
- धावेल
- यश चोक्सी
- शुभांगी साळकर
- दिलीप साळकर
- ममता साळकर
- तनिषा सावंत
- अंकिता चौधरी
- धनपत पंडित
- गोपाळ चोपडेकर
- स्नेहा चोपडेकर
- वेदांगी चोपडेकर
- मीना चव्हान
- प्रतिमा नाईक
- कल्पना नाडकर्णी
- स्मीता नाडकर्णी
- रुदया चोपडेकर
- मनिश सिंग
- मंजू खान्ना
मृत्यू झालेल्यांची नावे
- मितेश मीस्त्री
- मंजूबेन कंठारिया
- पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघ