मुक्तपीठ टीम
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या काही दुकानांना आज पहाटे भीषण आग लागली. अंधेरी स्टेशन परिसरात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ४ दुकानांना आग लागल्याने रेल्वेच्या काही भागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेतकोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार एका दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि काही वेळात ती काही दुकानांमध्येही पसरली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतू दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी अंधेरीच्या डीएन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पहााटेची वेळ असल्याने रेल्वे स्थानक परिसरात गर्दी नव्हती आणि दुकानही बंद होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.