Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तक्रारदार परमबीर सिंग आता आरोपी! एकामागोमाग एक आरोपांची मालिका!

April 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
parambir singh

मुक्तपीठ टीम

 

शंभर कोटींच्या महावसुलीचा आरोप करणाऱ्या लेटरबॉम्बनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता आरोपी झाले आहेत. त्यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भष्टाचाराचा आरोप केला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनीही परमबीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

परमबीर सिंगांविरोधातील आरोप

• परबीर सिंग यांनी हजारों कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी केली.
• परमबीर सिंग यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
• तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.
• परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.
• त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली.
• परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी भीमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटलं आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांसह डझनभर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा आरोप भीमराज घाडगे केला आहे.

 

परमबीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे. हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.


Tags: अनुप डांगेठाणे पोलीसपरमबीर सिंगभीमराज घाडगेमुंबई पोलीस
Previous Post

#अध्यात्म धार्मिक कथा कथन – श्रवण यातून मानव कल्याण

Next Post

आता चोरांचे नवे लक्ष्य रेमडेसिविर इंजेक्शन!

Next Post
remdesivir

आता चोरांचे नवे लक्ष्य रेमडेसिविर इंजेक्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!