मुक्तपीठ टीम
कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह आरोप केल्याने कॉमेडियन सुनिल पालला चांगलेच महागात पडले आहे. सुनील पालविरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालने ९० टक्के डॉक्टरांची चोर आणि राक्षसाशी तुलना करणारा व्हिडीओ यूट्युबवर पोस्ट केला होता. या व्हिडीओवरून सुनीलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉक्टरांनी केली तक्रार
- असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स मुंबईने ४ मे रोजी सुनील पालविरोधात गुन्हा दाखल केली आहे.
- असोसिएशनच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांच्या तक्रारीनुसार, स्टँड-अप कॉमेडियन सुनिल पालने यूट्यूबच्या मुलाखतीत डॉक्टरांवर खोटे आरोप केले आहेत.
सुनील पालची व्हीडीओ बकवास…
- सुनील पालने एप्रिलमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
- या व्हिडीओमध्ये, “डॉक्टर हे देवाचे रुप असतात, परंतु यावेळी ९० टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केले आहे.
- ते लोकांची फसवणूक करत आहेत.
- मी असेही ऐकले आहे की ते मृत्यूनंतर शरीरातून अनेक अवयवही काढून टाकले जात आहेत.
- कोरोना बाधित असल्याचं सांगून लोकांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
- माझ्या मते या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.