गौरव संतोष पाटील
ताडगोळा म्हटलं की मस्त मधूर आणि रसदार! तसंच उन्हाळ्याची काहिली कमी करणारं थंडदार. चवीलाच नाही तर दिसायलाही हे छोटंस शहाळं वाटतं. झाड ते आपल्यापर्यंतचा ताडगोळ्याचा प्रवास कठिण. पण टणक साल काढल्यावर आतील गराची गोड गारेगार मजाच वेगळी. आज मांडत आहोत ताडगोळ्याचा मस्त गोड गोड प्रवास…
ताडगोळे मुंबई ठाणे या शहरी भागातही मिळतात. मुख्यत्वे मुंबईत ते पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून येतात. तेथे ताडाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतकरी ताडाच्या झाडांवरून ताडगोळ्यांचे असे भले मोठे घड काढून घेतात. झाडांची उंची आणि त्यांच्या वजनामुळे ते काढणं सोपं नसतं. ते काढले की विकण्यासाठी पुढे घेतले जातात.
ताडगोळे झाडावरून काढले म्हणजे झालं असं नाही. त्यानंतर त्याची वाहतूक करणं हे वजनामुळे तेवढं सोपं नाही. त्यानंतरही झाडावरून काढले म्हणजे इतर फळांसारखे खाल्ले असेही नाही. त्यासाठी पुन्हा खूप कष्ट असतात. कसे ते पाहा.
त्यामुळेच बहुधा ताडगोळे विकणारे क्वचितच दिसतात. पण त्याचे उन्हाळ्यातील आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन तुम्ही जेव्हा मिळतील तेव्हा नक्कीच ताडगोळे घ्या. शक्यतो घासाघीस करू नका. त्यामागील कष्ट आठवा. तुम्हाला जसं त्याच्या मधुर शीतल चवीनं बरं वाटेल तसाच गोडवा त्यांच्या जीवनातही येऊ द्या…
वाचा:
उन्हाच्या काहिलीत सुमधुर शीतल दिलासा देणारे ताडगोळे असतात कसे? किती उपयोगी?
उन्हाच्या काहिलीत सुमधुर शीतल दिलासा देणारे ताडगोळे असतात कसे? किती उपयोगी?
पाहा व्हिडीओ: