मुक्तपीठ टीम
प्रत्येक गोष्टींमध्ये लागणारा कर, हा सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. असे असूनही याबाबत काहींना या गोष्टीची माहिती अजून नाही आहे. त्यात अनेक थेअरी टू फॉर्म्युला आहेत, त्यामुळे मुलं आणि तरुण त्यापासून दूर पळतात. पण आता मुलांना तसेच प्रौढांनाही कराच्या गुंतागुंतीबद्दल सहज आणि मजेदार पद्धतीने शिकता येणार आहे. कराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ई-कॉमिक बुक्स आणि बोर्ड गेम्सद्वारे कराविषयी माहिती दिली जाणार हे स्पष्ट केले आहे. हे पुस्तक आणि गेम सीबीडीटी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सद्वारे तयार करण्यात आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने दिलेल्या माहितीनुसार, खेळातून कराच्या आर्थिक व्यवहाराबाबत चांगल्या-वाईट गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने कर जागरूकता वाढवण्यासाठी बोर्ड गेम्स, ३डी पझल्स आणि कॉमिक बुक्स विकसित केल्या आहेत. ‘लर्न बाय प्ले’च्या माध्यमातून लोकांना करविषयक आवश्यक माहिती सहज कळू शकेल, हे विभागाचे उद्दिष्ट आहे.
मोटू-पतलू शिकवणार कराविषयीचं सर्वकाही!
- एका कॉमिक बुकचे लाँचिंगही करण्यात आले आहे.
- ज्यामध्ये लहान मुलांमध्ये मोटू-पतलू या कार्टूनच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने मुलांना आणि तरुणांना कराशी संबंधित गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- या दोन कार्टून कॅरेक्टरच्या माध्यमातून कर आणि आर्थिक जागरुकता वाढवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.
अर्थ मंत्रालयाच्या ‘प्रतिष्ठीत सप्ताह सोहळ्या’च्या ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या समारोप समारंभात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालय ‘धरोहर’ राष्ट्राला समर्पित केले. धरोहर सामान्य जनतेच्या प्रबोधनासाठी सीमाशुल्क विभागाच्या कार्यपद्धतींचे विस्तृतपणे चित्रण करते. आइन-ए-अकबरीची हस्तलिखिते, अमीन स्तंभांची प्रतिकृती, जप्त केलेल्या धातू आणि दगडी वस्तू, हस्तिदंती वस्तू आणि वन्यजीव वस्तू या ठेवलेल्या कलाकृतींमध्ये उल्लेखनीय आहेत.