Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सततच्या तक्रारीही असू शकते घटस्फोटासाठीचे कारण! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निकाल तक्रारखोर पती किंवा पत्नींना दणका देणारा आहे. न्यायालयाने म्हटले की, “सुशिक्षित व्यक्तीने जोडीदाराविरूद्ध सतत तक्रारी दाखल करणे म्हणजे मानसिक क्रूरता होय. यामुळे एखाद्या व्यक्तीचे करिअर आणि प्रतिष्ठेवर परिणाम घडवते. आणि त्या आधारावर घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो.”

न्यायमूर्ती संजय किशन कौल, दिनेश माहेश्वरी आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “एखाद्या जोडीदाराचे असं वागणं हे वैवाहिक जीवनातील सामान्य वागणं मानलं जाऊ शकत नाही. विशेषत: एखादी व्यक्ती सुशिक्षित असेल तर तिला तक्रारी दाखल करण्याचे परिणाम काय होऊ शकतील, याची कल्पना असते.”

“एका लष्कराच्या अधिकाऱ्याविरुध्द त्याच्या पत्नीने अनेक तक्रारी केल्या होत्या. त्या मानसिक छळ असल्याचा दावा करुन त्या आधारावर अधिकाऱ्याने घटस्फोटाची मागणी केली. त्या लष्कराच्या अधिकाऱ्याच्या घटस्फोटाची याचिका आता मंजूर झाली आहे. अधिकाऱ्याने दावा केला होता की, त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात त्याच्या वरिष्ठांकडे अनेक बदनामीकारक तक्रारी केल्या, त्यामुळे त्याच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वॉयरी नेमण्यात आले.

अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, राज्य महिला आयोगासह इतर अधिकाऱ्यांसमोरही अशाच तक्रारी केल्या गेल्या आहेत. पत्नीने मात्र असा दावा केला आहे की, वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी तिने तक्रारी केल्या होत्या.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, तिच्या या कृतीमुळे अधिकाऱ्याची प्रतिष्ठा कमी झाली आहे आणि अन्याय झालेल्या पक्षाने वैवाहिक संबंध कायम ठेवणे अपेक्षित असू शकत नाही.

“हे आरोप उच्चशिक्षित जोडीदाराने लावले आहेत आणि अपीलकर्त्याच्या प्रतिष्ठेवर परिणाम घडवून आणण्याची प्रवृत्ती त्यांची आहे. जेव्हा एखाद्या जोडीदाराची प्रतिष्ठा त्याचे सहकारी, वरिष्ठ आणि एकंदरीतच समाजाच्या नजरेत लयाला जाते तेव्हा त्या पीडिताकडून माफीची अपेक्षा ठेवणे कठिणच असते, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोट योग्य ठरवत उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला.
उच्च न्यायालयाने पत्नीच्या बाजूने हा आदेश दिला होता.


Tags: खंडपीठघटस्फोटदिनेश माहेश्वरीन्यायमूर्ती संजय किशन कौलसर्वोच्च न्यायालयहृषिकेश रॉय
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला ‘हवा येऊ द्या’. या मंचावर अनेक कलाकार उपस्थित होते. नुकतेच या कार्यक्रमात लोकप्रिय मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला”मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या भागात ओम आणि स्वीटूने अनेकांचं लक्ष वेधून घेतले आणि धम्माल केली. २) अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडियावर कायम ऍक्टीव्ह असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिणीसोबतचा म्हणजेच इनायासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने तिच्या चाहत्यांचे जिंकले आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. ३) मराठी शो ‘बिग बॉस’ तसेच ‘रोडीज’सारख्या रिअॅलिटी शो मधून आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने ‘लोकल’ प्रवास करत तृतीयपंथीयांशी संवाद साधला. शिवचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ४) सोशल मीडियावर सलमान खानच्या गाण्यांची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे. ५) झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी “अण्णा नाईक… परत येणार!!! ‘रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच…” असे कॅप्शन दिले आहे.

Next Post

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा, भाजपा आक्रमकच राहणार

Next Post
rathod resignation to cm

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा, भाजपा आक्रमकच राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!