Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली राळेगणसिद्धी येथे पाचवे पर्यावरण संमेलन संपन्न

बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे यांच्याहस्ते धीरज वाटेकर सन्मानित

December 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
anna hajare

मुक्तपीठ टीम

आपल्या लेखनातून सातत्याने पर्यावरण जतन आणि संवर्धनाची भूमिका मांडणारे पर्यावरणप्रेमी पत्रकार, लेखक धीरज वाटेकर यांचा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या पर्यावरण संमेलनात बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे यांच्याहस्ते ‘विशेष सन्मान’ करण्यात आला. हे संमेलन राळेगणसिद्धी येथील ‘हिंद स्वराज ट्रस्ट’च्या सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

 

यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, ‘वुई सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. स्थापत्य अभियंता असलेले धीरज वाटेकर ‘प्रसन्न प्रवास’ नावाने ब्लॉगलेखन करतात. पर्यावरण, पर्यटन, छायाचित्रण आणि चरित्रलेखन हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. पुणे येथील निराली प्रकाशन समूहाचे ते कोकण आणि गोवा प्रतिनिधी आहेत. गेली २४ वर्षे ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दैनिक लोकसत्ता, दैनिक पुढारी या वृत्तपत्रांकरिता ग्रामीण पत्रकारिता केली आहे. आपल्या आवडीतून वैयक्तिक संदर्भीय कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, “परमचिंतन” अभ्यासिका आणि जुन्या वस्तूंचा संग्रह करणाऱ्या वाटेकर यांनी विविध अभ्यासदौरे, गुहांची पाहाणी, पर्यटन अध्ययन, संशोधन, जंगलभ्रमण याकरिता भूतानसह हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान प्रवास केलेला आहे. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन विषयावरील ८ पुस्तकांचे लेखन केले आहे. २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या ‘उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार’सह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या ‘तेर पॉलिसी सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेकडून ‘प्रकाशाचे बेट’  आदि विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

 

या पर्यावरण संमेलनाला पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सोलापूर, जळगाव, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड, लातूर, सांगली येथील प्रतिनिधी उपस्थित होते. वाटेकर यांनी आपले सहकारी विलास महाडिक, ‘वनश्री’ महेंद्र घागरे, सुधाकर शेट्ये यांच्यासह गेल्यावर्षी २२ नोव्हेंबर रोजी राहीबाई पोपेरे यांच्या त्यांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावी जाऊन भेट घेऊन त्यांच्या बीज बँकेची माहिती समजून घेतली होती.


Tags: Anna Hajareenvironment conferenceRalegansiddhiअण्णा हजारेपर्यावरण संमेलनराळेगणसिद्धी
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक

Next Post

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी

Next Post
pimpri chinchwad jayastambh

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!