Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फिफाच्या १७ वर्षाखालील महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचे भारतात आयोजन होणार

July 28, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
FIFA U17 Womens WorldCup

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वर्षाखालील महिलांच्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धा २०२२ चे भारतात आयोजन करण्यासंदर्भातील हमीपत्रांवर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे.

भारतात ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १७ वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. ही सातवी द्विवार्षिक युवा स्पर्धां असून फिफा महिला फुटबॉल स्पर्धा भारताच्या यजमानपदात प्रथमच होईल. १७ वर्षांखालील पुरुषांच्या फिफा विश्वचषक २०१७ या स्पर्धांचा सकारात्मक वारसा पुढे नेत देश या विशिष्ट क्षणासाठी सज्ज होत आहे ज्यामध्ये जगभरातील युवा महिला फुटबॉलपटू मानाचा चषक जिंकण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करतील.

वित्तीय खर्च:

राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या मदत योजनेसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या स्पर्धांच्या कालावधीत, मैदानाची देखभाल, स्टेडीयममधील वीजपुरवठा, उर्जा आणि केबल , स्टेडीयम आणि प्रशिक्षण स्थळाचे ब्रांडिंग इत्यादीसाठी एआयएफएफ अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला १० कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात येणार आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये:

  • १७ वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये भारतातील महिला फुटबॉल खेळाला अधिक बळकटी देण्याची क्षमता आहे.
  • १७ वर्षांखालील पुरुषांच्या फिफा विश्वचषक २०१७ या स्पर्धांचा सकारात्मक वारसा पुढे नेत देश महिला फुटबॉलच्या या विशिष्ट स्वरूपाच्या क्षणासाठी सज्ज होत असून या स्पर्धेत देशभरातील सर्वोत्तम युवा महिला फुटबॉलपटू मानाचा चषक जिंकण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करतील.
  • सकारात्मक वारशासाठी खालील उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत:
  • फुटबॉल नेतृत्व तसेच निर्णय-घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ करणे
  • भारतातील अधिकाधिक मुलींना फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहन देणे
  • लहान वयापासूनच समान खेळाच्या संकल्पनांचा स्वीकार करून महिला-पुरुष सहभागाचे समर्थन करणे
  • भारतात महिलांसाठी फुटबॉलखेळाचे मानक सुधारण्याची संधी
  • महिलांच्या क्रीडास्पर्धांचे व्यावसायिक मूल्य सुधारणे

औचित्य :

१७ वर्षांखालील महिलांची फिफा विश्वचषक स्पर्धा ही अत्यंत मानाची स्पर्धा असून भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनातून अधिकाधिक युवा महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे भारतात फुटबॉलचा खेळ अधिकाधिक विकसित होण्यास मदत होईल. या स्पर्धेमुळे भारतीय मुलींना पसंतीचा खेळ म्हणून फुटबॉलची निवड करण्यास मदत होईलच पण त्याचबरोबर देशातील मुलींना आणि महिलांना फुटबॉल आणि एकूणच खेळांचा स्वीकार करणे अधिक सोपे होईल.

पार्श्वभूमी:

१७ वर्षांखालील महिलांची फिफा विश्वचषक स्पर्धा ही फिफा संघटनेतर्फे आयोजित केली जाणारी १७ वर्षे अथवा त्याखालील वयाच्या महिला खेळाडूंची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. ही स्पर्धा २०१८ साली पहिल्यांदा आयोजित करण्यात आली आणि त्यानंतर पारंपरिकरित्या सम क्रमांकाच्या वर्षी आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा ६ वा भाग १३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीत उरुग्वे येथे भरविण्यात आला. स्पेन देश सध्या १७ वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा विजेता आहे. भारतामध्ये या स्पर्धेचा ७ वा भाग आयोजित करण्यात आला असून त्यात भारतासह एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. भारतात भुवनेश्वर, नवी मुंबई आणि गोवा या तीन ठिकाणी या स्पर्धेच्या फेऱ्या होतील असे एआयएफएफने जाहीर केले आहे. भारताने ६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत नवी दिल्ली, गुवाहाटी,मुंबई,गोवा,कोची तसेच कोलकाता या सहा विविध ठिकाणी 17 वर्षांखालील पुरुषांच्या फिफा विश्वचषक भारत-२०१७ या स्पर्धेतील सामन्यांचे यजमानपद यशस्वीपणे सांभाळले होते.


Tags: FIFAFIFA Womens U17good newsIndiaUnion Cabinetफिफासरकारी बातमी
Previous Post

बीएसएनएलच्या १ लाख ६४ हजार कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी!

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्वाचे निर्णय

Next Post
Maharashtra Cabinet Decision

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्वाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!