मुक्तपीठ टीम
जर तुम्ही पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतेलेले आहात आणि तुम्ही फेलोशिपच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दैनिक भास्कर सारख्या नामवंतर दैनिकाने पत्रकारिता पदवीधरांसाठी संधी दिली आहे. या अंतर्गत, निवडलेल्या सहभागींना भोपाळमध्ये असलेल्या दैनिक भास्करच्या प्रिंट आणि डिजिटल न्यूजरूममध्ये पंधरा महिने काम करण्याची संधी मिळेल.
यादरम्यान दरमहा ३० हजार रुपये मानधनही दिले जाणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी १२ डिसेंबरपूर्वी अर्ज करावे. फेलोशिप जानेवारी २०२२ पासून सुरू होईल.
शैक्षणिक पात्रता-
पत्रकारितेत पदवी/पदव्युत्तर. हिंदी वाचन, लेखन आणि समजण्यात प्रवीणता आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
वय २५ वर्षांपेक्षा कमी असावे.
अर्ज प्रक्रिया
- bhaskar.com/journalismfellowship वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे ऑनलाइन मूल्यमापन केले जाईल.
- त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- अंतिम निर्णय पॅनेल मुलाखतीवर आधारित असेल.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२१ आहे.
फेलोशिपमध्ये काय मिळणार
- फेलोशिपसाठी निवडलेल्यांना १५ महिने दैनिक भास्करच्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत काम करण्याची संधी मिळेल.
स्टायपेंड व्यतिरिक्त, फेलोशिप संपल्यानंतर भास्करसोबत पूर्णवेळ काम करण्याचीही संधी आहे.