Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पूरग्रस्त चिपळूणला मायेचा आधार देत सावरणाऱ्या टीम ठाणेचा गौरव

अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
chiplun

राजा माने / मुक्तपीठ टीम

आभाळच फाटलं. भुईला हव्याशा वाटणाऱ्या पाण्यानंच तिला बुडवलं. नदी उतूच गेली तशी. चिपळूणसह कोकणातील मोठ्या भागात होत्याचं नव्हतं करणारा महापूर साऱ्यांनाच हादरवणारा. पण त्या महासंकटातच माणुसकीचा गहिवर मोठाच आला. ठाणे मनपाच्या टीम ठाणेनं थेट पूरग्रस्त चिपळूणमध्ये धाव घेत आधार दिला. सावरलं.

 sanjay herwade

महापूरग्रस्त चिपळूण शहराला कचरा, चिखल आणि आरोग्याच्या असंख्य समस्यांतून मुक्ती देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला.

 sanjay herwade

महापुराच्या संकटाने चिपळूण अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. चिखल, कचरा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराईचे स़ंकट गावावर घोंगावत होते. या संकटातून चिपळूणला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र मदतीला धावला होता. अशा परिस्थितीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विपिन शर्मा यांनी तातडीने बैठक घेतली. एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे तेथील आपत्ती व्यवस्थापनाची मोहीम मोठ्या विश्वासाने सोपविली. हेरवाडे यांनीही जिद्द, व्यवस्थापन कौशल्य आणि टीमवर्कच्या बळावर पूरग्रस्त चिपळूण शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ऐतिहासिक कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.

 sanjay herwade

तब्बल २५हजार टन चिखल, कचरा काढून शहर पूर्वपदावर आणण्यासाठी कष्ट उपसले. नानासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी प्रतिष्ठान, नाणिज संस्थान, संत निरंकारी मंडळ, असंख्य स्वयंसेवी संस्थां आणि चिपळूण, नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या सुमारे आठशे कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन आणि समन्वय मोठ्या खुबीने साधला.

 sanjay herwade

संजय हेरवाडे यांनी केलेल्या या कार्याचा गौरव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने ठाणे जिल्हा नियोजन भवनात हा सोहळा पार पडला.

 

(ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी खास मुक्तपीठसाठी शब्दबद्ध केलेली चांगली बातमी)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: chiplunfloodMinister Eknath Shindethaneचिपळूणठाणे महापालिकामंत्री एकनाथ शिंदेमहापुरासंजय हेरवाडे
Previous Post

आपल्या लाडक्या लेकीसारखंच शेतकऱ्याकडून गाईचं डोहाळं जेवण

Next Post

रंगिबेरंगी…सुंदर…मनमोहक…नाशिकच्या रुग्णालयात नुतन चाइल्ड वॉर्ड!

Next Post
chhagan bhujbal

रंगिबेरंगी...सुंदर...मनमोहक...नाशिकच्या रुग्णालयात नुतन चाइल्ड वॉर्ड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!