मुक्तपीठ टीम
जियोने ‘मेकिंग ऑफ जियोफोन नेक्स्ट’ हा व्हिडीओ रिलीज केला आहे. जियोफोन नेक्स्ट लाँच करण्यामागील दृष्टी आणि कल्पना स्पष्ट करणे हा या व्हिडीओचा उद्देश आहे. हा नवा फोन भारताला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला आहे. याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांचे लक्ष वेधले जाऊ लागले आहे. पाच वर्षांच्या अल्प कालावधीतच जियोने भारतात मोठे नाव आणि आपल्यासाठी महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. सध्या देशात त्यांचे ४३ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. भारतातील प्रत्येक घरापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, रिलायन्स जियोने एक निर्णायक पाऊल उचलण्याची योजना आखली आहे.
जियोफोन नेक्स्ट विषयीची सविस्तर माहिती
- जियोफोन नेक्स्ट हा मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया आणि मेड बाय इंडिया फोन आहे.
- जियोफोन नेक्स्ट प्रत्येक भारतीयाला डिजिटल तंत्रज्ञानाच्या समान संधी आणि लाभ मिळतील याची खात्री करेल.
- जियोफोन नेक्स्टमध्ये लाखो भारतीयांचे जीवन बदलण्याची ताकद कशी आहे हे कंपनी व्हिडीओमध्ये स्पष्ट करते.
- जियो फोन नेक्स्ट प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. ही गुगल अॅंड्रॉईडने बनवलेली जागतिक दर्जाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी खास भारतासाठी बनवली गेली आहे.
- प्रगती ओएस हे जियो आणि गुगलच्या सर्वोत्तम तंत्रज्ञांनी विकसित केले आहे. आणि नावाप्रमाणेच, परवडणाऱ्या किंमतीत उत्कृष्ट अनुभवांसह सर्वांसाठी प्रगती सुनिश्चित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
जियोफोन नेक्स्टचा प्रोसेसर देखील उत्तम आहे, तो क्वॉलकॉमने विकसित केला आहे. जियोफोन नेक्स्टमध्ये लावलेला क्वॉलकॉम प्रोसेसर फोनची कार्यक्षमता सुधारेल. हा प्रोसेसर ऑप्टिमाइझ्ड कनेक्टिव्हिटी आणि लोकेशन टेक्नॉलॉजी, ऑडिओ आणि उत्तम बॅटरी वापर वाढवेल. जियोफोन नेक्स्टचे फिटर्स पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
जियोफोनचे फिटर्स
- व्हॉइस असिस्टंट यूजर्सना डिव्हाइस ऑपरेट करण्यास तसेच इंटरनेटवरील माहिती, कंटेन्ट त्यांच्या स्वत:च्या भाषेत सहज प्रवेश करण्यास मदत करते.
- हे वापरकर्त्यांना त्यांना समजेल अशा भाषेत बोलून कंटेन्ट वापरण्याची परवानगी देते.
- वापरकर्त्याला त्याच्या आवडीच्या भाषेत कोणत्याही स्क्रीनचे भाषांतर करण्याची क्षमता देते.
- हे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीच्या भाषेत कोणतेही कंटेन्ट वाचण्यास मदत करते.
- डिव्हाइसमध्ये पोर्ट्रेट मोड विविध फोटोग्राफी मोड, स्मार्ट आणि पॉवरफुल कॅमेरा या फिचर्ससह संपन्न आहे.
- कॅमेरा अॅप इंडियन ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह प्री-लोड केलेले आहे. म्हणजेच, बरेच फिल्टर कॅमेरामध्ये प्री-लोड केलेले असतात.
जियोफोन नेक्स्ट जियो आणि गुगल अॅप्ससह प्रीलोडेड
सर्व उपलब्ध अॅंड्रॉईड अॅप्स डिव्हाइसमध्ये वापरले जाऊ शकतात. जे गुगल प्ले स्टोअरद्वारे डिव्हाइसवर डाउनलोड केले जाऊ शकते. अशा प्रकारे त्यांना प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या लाखो अॅप्समधून कोणतेही अॅप निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. हे अनेक जियो आणि गुगल अॅप्ससह प्रीलोड केलेले आहे.