मुक्तपीठ टीम
जून २०२१ मध्ये पथकर संकलन वाढून २,५७६.२८ कोटी रुपये झाले असून ते मे २०२१ मध्ये जमा झालेल्या २,१२५.१६ कोटी रुपये पथकर संकलनापेक्षा सुमारे २१ टक्क्यांनी अधिक आहे. सुमारे ३.४८ कोटी वापरकर्त्यांसह, देशभरात फास्टॅग वापर सुमारे ९६ टक्के आहे आणि बर्याच पथकर नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून ९९% प्रवेश आहे. एका अंदाजानुसार, फास्टॅगमुळे इंधनावर वर्षाकाठी सुमारे २०,००० कोटी रुपयांची बचत होईल, त्यामुळे परकीय चलनाची बचत होऊन पर्यावरण समतोल राखण्यासही मदत होईल.
महामार्ग वापरकर्त्यांद्वारे, फास्टॅगच्या वापरात सतत वाढ आणि स्वीकारार्हतेमुळे राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील वाहनांचा प्रतीक्षा वेळ कमी झाला आहे.