मुक्तपीठ टीम
दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये या सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांनीसुद्धा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून आता पैसे वसूल करण्याची प्रक्रिया संबंधित राज्य सरकारने सुरू केली आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासात ही बाब उघड झाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ न घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारने जारी केली होती.
- उत्तर प्रदेशांत २.३४ लाख लाभार्थी हे कर भरणारे आहेत. तर मृत्यू झालेल्या ३२,३०० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हप्ता जमा होत आहे.
- बनावट आधारकार्डद्वारे ३,८६,००० शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत.
- ५७,९०० शेतकऱ्यांना अन्य कारणास्तव अपात्र करण्यात आले आहे.
‘हे’ सदस्य किसान सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
- संस्थात्मक शेतकरी
- डॉक्टर, वकील, सीए, अभियंता तसेच आर्किटेक्चरसारखे व्यावसायिक
- लोकसभा, राज्यसभेचे विद्यमान किंवा माजी सदस्य
- राज्य विधानसभा किंवा विधानपरिषदेचे विद्यमान किंवा माजी सदस्य
- नगरपरिषदेचे विद्यमान किंवा माजी सदस्य
- जिल्हा पंचायतीचे विद्यमान किंवा माजी सदस्य
- केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीएसयूएसचे विद्यमान किंवा सेवानिवृत्त अधिकारी
- दहा हजाराहून अधिक पेन्शन घेणारे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी
- दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यालासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- मागील आर्थिक वर्षात कर भरणारे
- चुकीची नोंदणी करणाऱ्यालासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत…
- प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ६००० हजार रुपये जमा
- तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै महिन्यांत
दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत
तिसरा हप्ता – डिसेंबर ते मार्च महिन्यांत - किसान योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.