Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजवर चाखले नसतील ते आंबे चाखा! मुंबईत अवतरले ‘छोटा जहांगीर’, ‘लिली’, ‘फर्नांडीन’ आदी ३२ जातींचे आंबे!

'ग्लोबल कोकण'च्या पुढाकाराने १ मे ते ३१ मे दरम्यान 'शेतकरी आंबा बाजार'चे आयोजन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mango Fleea

मुक्तपीठ टीम

आंबा म्हंटलं की आठवतो आपल्या कोकणचा अस्सल हापूसच! पण हापूसबरोबरच कोकणात रत्ना, पायरी, निलम असे अनेक इतरही आंबे मिळतात. आता शा तब्बल ३२ जातींचे कोकणातील आंबे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मुंबईकर आणि ठाणेकरांना मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ आयोजित ठाण्याच्या शेतकरी बाजारात जावं लागेल. घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधील प्रदर्शनानंतर आता महाराष्ट्र दिनापासून ठाण्यातील टीएमसी ग्राऊंडमध्ये शेतकरी आंबा बाजार भरलाय.

या बाजारात आंबे विकत घेण्याबरोबरच गोडसर, केशरी-पिवळसर रंगाच्या आंब्याच्या लागवडीसाठी कोकणची माती, हवा कशाप्रकारे अनुकूल आहे, याची माहिती ऐकता येईल. ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे आयोजित ‘मँगो फ्ली’ उपक्रमांतर्गत घाटकोपर येथील आरसिटी मॉलमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आता महाराष्ट्र दिनापासून . कोकणच्या शेतातून ते थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असणार्‍या हापूसची ग्राहकांना खरेदी करता येईल. याचे उद्घाटन २९ एप्रिल रोजी करण्यात आले. रत्नागिरी, पावस, मालवण, राजापूर, विजयदुर्ग आदी भागातील हापूसचे १० स्टॉल्स लावण्यात आले असून खुद्द शेतकरी यांची विक्री करणार आहेत. या माध्यमातून ३५० हून अधिक शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हिरानंदानी ईस्टेट, मॅकडॉनल्ड जवळ टीएमसी ग्राऊंडमध्ये ‘शेतकरी आंबा बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. जिथे ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूस आंब्याची खरेदी करता येईल. हा ‘शेतकरी आंबा बाजार’ ३१ मेपर्यंत सुरु राहील.

”हापूस आंब्याचा लोकल ते ग्लोबल ब्रँड विकसित करत शेतकऱ्यांना व्रिकीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मॉल्स, महामार्ग, लोकल बाजार ते परदेशात आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.” असे ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले. संस्थापक निलेश सांबरे यांच्या ‘जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणीक संघटने’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले असून पालघरमधील आदिवासी माहिला यंदा शेतकर्‍यांना आंबा विक्रीसाठी मदत करणार आहेत. ”आंबा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे, त्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा या दृष्टीने राबवण्यात येणारे हे उपक्रम वाखणण्याजोगे आहेत.” असे ‘समृद्ध कोकण शेतकरी संघटने’च्या सचिव मनीषा डमरी म्हणाल्या. ”२९ एप्रिल ते १ मे पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांना याला भेट द्यावी.” असे आवाहन ‘आयलीफ कनेक्ट’चे संस्थापक प्रतिश आंबेकर यांनी केलं आहे.

‘आय लीफ कनेक्ट’च्या सहकार्याने आयोजित ’मँगो फ्ली’ अंतर्गत आंब्याची विक्री, मँगो कॅफे आणि सोबत लाईव्ह मनोरंजन…असा उपक्रम पार पडणार आहे. ’रिजनल फूड्स’चे सह संस्थापक आणि सेलिब्रिटी शेफ सनी पावसकर यांनी आंब्यापासून बनवलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचा यावेळी आस्वाद घेता येईल.

या संपूर्ण उपक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन, तर सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा पाठिंबा असून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा यांचे सहकार्य लाभले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Chota Jehangir MangofarmersFernandin MangoGlobal Konkangood newsI Leaf ConnectLily MangomangoMango Marketmuktpeethmumbaiआंबा बाजारआंबेआय लीफ कनेक्टग्लोबल कोकणचांगली बातमीछोटा जहांगीर आंबाफर्नांडीन आंबामुक्तपीठमुंबईलिली आंबाशेतकरी
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE #मनसे #संभाजीनगर राज ठाकरे यांचं दणदणीत खणखणीत भाषण

Next Post

एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये आता ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी

Next Post
mtdc

एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये आता ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!