Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटातही शेतकऱ्यांची कामगिरी, ऊसाचं विक्रमी गाळप, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र नं. १

May 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
framers

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप केलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आलं आहे. तसेच इथेनॉल निर्मितीतही महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. याचं श्रेय कोरोना संकटातही मेहनतीत खंड पडून देता ऊसाचं चांगलं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिलं जात आहे.

 

१८९ साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम

  • राज्यात यावर्षी २०२०-२१ च्या हंगामात एकूण सहकारी आणि खासगी अशा मिळून एकूण १८९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.
  • महाराष्ट्राची गाळप क्षमता ७६ हजार टनानं वाढली आहे.
  • यावर्षीच्या हंगामात एक हजार १२ लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्यात आलं.
  • १४० दिवसांचा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे.
  • पावसाळा येण्यापूर्वीच राज्यातील सर्व ऊसाचं गाळप झालं आहे.

इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!

  • साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याची माहिती दिली आहे.
  • गेल्या पाच वर्षात इथोनॉलच उत्पन्न झालं नाही ते यावर्षी झालं आहे, असंही ते म्हणाले.

 

सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात

  • यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले आहे. साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे.
  • पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के इतका आहे.
  • सर्वात कमी उतारा नागपूर विभागात राहिला आहे.

कोरोनाच्या संकटातही विक्रमी गाळप

  • कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ चा गाळप हंगाम सुरु झाला.
  • राज्यातील शेतकऱ्यांची मेहनत, साखर कारखान्यांची यंत्रणा याद्वारे राज्यामध्ये कोरोनाचं संकट असतानाही विक्रमी गाळप झालं आहे.
  • यानिमित्तानं महाराष्ट्र हे साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

 

या विक्रमी गाळपाची आकडेवारी

  • कोल्हापूर-२३१.०९ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन २७७.३८ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा १२ टक्के
  • पुणे- २३०.९३ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन २५३.२६ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के
  • सोलापूर- १७५.८६ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन १६४ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के
  • अहमदनगर – १६९.६४ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन १६६.५८ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के
  • औरंगाबाद – १००.०३ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ९६.९० लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के
  • नांदेड – ९४.२८ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ९४ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के
  • अमरावती – ५.८२ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ५.२० लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ८.९३ टक्के
  • नागपूर – ४.३५ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ३.९० लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ८.९७ टक्के

Tags: ethanolMaharashtraइथेनॉलमहाराष्ट्र
Previous Post

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

Next Post

‘सर्च’चा लैंगिक शिक्षण कार्यक्रम आता यू-ट्यूबवर, डॉ. राणी बंग यांचं मार्गदर्शन

Next Post
dr rani bang

‘सर्च’चा लैंगिक शिक्षण कार्यक्रम आता यू-ट्यूबवर, डॉ. राणी बंग यांचं मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!