उदयराज वडामकर
मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात होते. शेतकरी चातक पक्षाप्रमाणे आकाशात डोळे लावून वरुणराजाची वाट पाहत असतात. पाऊस आज येईल उद्या येईल अशा आशेवर शेतकरी असतात. मात्र, यावेळी मृग नक्षत्रात पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांनी मुक्तपीठकडे आपल्या भावना मांडल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या औजाराने शेतीच्या कामाला सुरुवात केली. मात्र यानंतर पावसांचा एक थेंबही पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके करपू लागली होती. पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणीस तयार करून ठेवली आहे.
काही ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. माळ राणात पावसाची गरज भासत आहे . पण वरुणराजा बरसण्याला विसरून गेला की काय असे शेतकऱ्यांना वाटत आहे. नीत्यनियमाने शेतकरी यादिवसात पंढरपूर वारीला जायला निघतो. परंतु यावेळी मृग नक्षत्रात पाऊस पडला नसल्यामुळे यावेळी शेतकऱ्याची पंढपूरवारी वारी चुकणार आहे. विठू रायाचे दर्शन यावेळी मिळेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.