Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुधाचा ३५ रुपये दर तातडीने पुन्हा सुरू करा, राज्यभरातील आंदोलनाला चांगला प्रतिसाद

किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती दूध दर, शेतकरी प्रश्नासाठी रस्त्यावर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
milk protest (2)

मुक्तपीठ टीम

 

अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १७ जून रोजी संपन्न झालेल्या आंदोलनाला राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून व निवेदने देऊन दूध व इतर शेतकरी प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

milk protest

लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध भेसळी बंद करा. टोंन्ड दुधावर बंदी आणा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या. या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे, बीड, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, औरंगाबादसह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन संपन्न झाले.

milk protest (3)

अहमदनगर जिल्ह्यतील अकोले तालुक्याचे अंबड, व कोतुळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदशने करत सरकारला दुधाचा अभिषेक घातला. दुपारी अकोले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खरीप हंगामाच्या दृष्टीने खते, बियाणे, कर्ज, वीज व विमा याबद्दलच्या प्रश्नानांही यावेळी वाचा फोडणीत आली. डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, जे.पी. गावीत, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.


Tags: akhil bhartiya kisan sabhadr ajit nawalemilkअखिल भारतीय किसान सभाडॉ. अजित नवलेदूधशेतकरी
Previous Post

“इगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता”: गुलाबराव पाटील

Next Post

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी येवल्यात समता परिषदेचा रास्ता रोको

Next Post
obc

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी येवल्यात समता परिषदेचा रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!