Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“केंद्राचा एफआरपीच्या मोडतोडीचा घाट, राज्यात तसं केल्यास आघाडी सरकार भुईसपाट!”

शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raju shetti

मुक्तपीठ टीम

 

केंद्र सरकारने एफआरपीची मोडतोड करून तुकड्यामध्ये एफआरपी देण्याचा घाट घातलेला आहे. निती आयोगाने त्याप्रमाणे हालचाली सुरू केल्या आहेत. एफआरपीची मोडतोड केल्यास शेतकर्‍यांचा देशभर उद्रेक होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. राज्यात महाविकास आघाडी सरकारने  साखर सम्राटांच्या दबावाला बळी पडून राज्यात केंद्राचा निर्णय लागू केल्यास हे सरकार पत्त्याप्रमाणे कोसळून भुईसुपाट होईल, असा इशाराही यावेळी दिला.

 

निती आयोगाने नुकतीच एक बैठक घेऊन एफआरपीची फेररचना करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये एफआरपी ही तीन टप्प्यात दिली गेली पाहिजे. असा सूरही बैठकीत आला आहे. याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, खासगी साखर सम्राट तसेच शुगर लॉबीच्या दबावापुढे केंद्राने हा निर्णय घेण्याचा घाट घातलेला आहे. केंद्र सरकारने तीन कृषि कायदे करून शेतकर्‍यांना अदानी आणि अंबानी सारख्या उद्योगपतींच्या हाती सोपवले. दे देतील तसा शेतीमालाचा दर घ्या, किमान आधारभूत कागदावरच राहील, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. यातून ऊस उत्पादक शेतकरी बाजूला राहिलेला होता. त्याला एफआरपीची आधार होता. शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्ट १९६६ अ नुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसाच्या आत केंद्राने ठरवलेली एफआरपी एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक होती. परंतु, हे बंधनच काढून टाकायचे व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हक्कावर घाला घालण्याचे कारस्थान निती आयोगाच्या माध्यमातून करण्याचे सुरू आहे. खासगी साखर कारखान्यांना पाठीशी घालण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. बाजारात मिळणार्‍या साखरेच्या भावाच्या ७५ टक्के दर घ्या, अशी भूमिकाच केंद्राची आहे. ते ही ३-४ टप्प्यात घ्या, म्हणजे शेतकर्‍यांना खाईत घालण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यात केंद्राने हे राज्य सरकारवर सोपवले आहे. राज्य सरकारने यावर अभ्यास गट नेमलेला आहे. मात्र यामध्ये शेतकर्‍यांना कुठेही स्थान आहे. महाविकास आघाडीला ऊस पट्ट्यातून भरभरून मते दिलेली आहे. राज्य सरकारने हे लागू केल्यास राज्यातील सरकारचा सुफडासाफ होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावे. केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.


Tags: chief minister uddhav thackerayfarmersprime minister narendra modiRaju shettiएफआरपीनिती आयोग
Previous Post

फडणवीसांच्या प्रयत्नांनी ३८ मेट्रीक टन ऑक्सिजन नागपुरात!

Next Post

“केंद्र सरकारने देशभरात मोफत कोरोना लसीकरण करावे!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"केंद्र सरकारने देशभरात मोफत कोरोना लसीकरण करावे!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!