Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू शेट्टी आघाडीविरोधात आक्रमक! दोन तुकड्यांमधील ऊस एफआरपी आघाडीला कोल्हापुरात भोवणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti Sugarcane FRP

मुक्तपीठ टीम

ऊसासाठी एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असूनही तो दोन तुकड्यात देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो आहे. आता तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा ggसंघात काँग्रेसच्या वतीने लढणाऱ्या आघाडीच्या उमेदवाराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधीच शिवसैनिकांमध्येही नाराजी असल्याचं उघड झाले आहे.

 

काय म्हणाले राजू शेट्टी?

  • ऊसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करून घेतला आहे.
  • त्यावर पुर्नविचार करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त तसेच संबंधित खात्याचे सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.
  • राज्य सरकारला एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा अधिकार नसल्याने ती एकरकमी देण्याची मागणी केली होती.
  • सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांनी पत्राद्वारे कारखान्यांच्या बाजूनेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत एफआरपी दोन टप्प्यातच दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
  • राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे.
  • यात शेतकर्‍यांचा तोटा होणार नसल्याने तो कदापी बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

एफआरपी एकरकमी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही!

  • शेतकर्‍यांना विश्वासात न घेता साखर कारखानदारांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या या निर्णयाविरूध्द मी याचिका दाखल केली आहे.
  • एफआरपी एकरकमी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही.
  • रस्त्यावरील संघर्ष अटळ असून याचे गंभीर परिणाम आघाडी सरकारला भोगावे लागतील.

 

कोल्हापुरातील लढाई आता नाही सोपी!

  • कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
  • महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना देण्यात येणार आहे.
  • मात्र असं असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत पाच वेळा निवडून आलेल्या शिवसेनेचा हक्क डावलला जात
  • असल्याच्या भावनेतून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
  • मात्र,स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमधील नाराजी कायमच असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • शिवसैनिकांच्या या नाराजीचा फटका तीन विरुद्ध एक समीकरणाच्या बळावरच्या आघाडीच्या निवडणूक रणनीतीला बसण्याची शक्यता आहे.
  • त्यात पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमकतेनेही वजाबाकी ठरलेली मानली जाते.

Tags: CongressMva govtRaju shettiShivsenaSugarcane FRPऊस एफआरपीकाँग्रेसकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकमहाविकास आघाडीराजू शेट्टीशिवसेना
Previous Post

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदावर नोकरीची संधी

Next Post

अंतराळातून थेट डिलिव्हरी!

Next Post
अंतराळातून थेट डिलिव्हरी!

अंतराळातून थेट डिलिव्हरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!