Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

असंतोष उफाळला! तिरंगे फडकवत ट्रॅक्टरसह दिल्लीत घुसले शेतकरी!

अखेर नको तेच घडले! पोलीस आणि शेतकरी संघर्ष!!

January 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Delhi Farmer Police Clash -1

मुक्तपीठ टीम

 

अखेर ज्याची भीती होते तेच दिल्लीत घडू लागले आहे. जे घडू नये तेच घडत आहे. बिघडत आहे.  गेले दोन महिने दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, काहीवेळा पावसाचा माराही सहन करत आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांपैकी काहींचा संयम आज संपला. पोलिसांनी उभारलेले अडथळे झुगारून बरेच शेतकरी दिल्लीत घुसले आहेत. अनेक ठिकाणी दगडफेक, लाठीफेक आणि पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा झाला आहे. शेतकरी त्यांच्या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे आताचे चित्र आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर संचलनाचे आयोजन केले आहे. दुपारी १२नंतर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन सुरु होणार होते. पण अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्ली सीमांवर पोहचले. वेळेआधीच सिंघु आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सना तोडून दिल्लीत प्रवेश केला. यानंतर हे शेतकरी बराच काळ मुकरबा चौकात बसले परंतु त्यानंतर त्यांनी तेथे लावलेले बॅरिकेड्स आणि सिमेंट ब्लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. काही उचलून फेकण्यातही आले.

ठरलं होतं तसं नाही झालं, नेमकं कसं अपेक्षित होतं…क्लिक करा आणि वाचा

शेतकरी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी अश्रूधुंरांच्या गोळ्यांचा मारा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजपथ येथे सुरू असलेली प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिली असल्याचे सतत आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही बरेच शेतकरी ट्रॅक्टरसह वाट्टेल त्या रस्त्यांवर वेगाने जाताना दिसून आले. अनेक ट्रॅक्टर्सवर तिरंगा झेंडे लावलेले आहेत. तसेच पुरुष आणि महिला ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहेत.  काही आंदोलक विविध झेंडे हातात घेऊन चालत असल्याचेही दिसले.


Tags: Farmer Delhi Protestfarmer tractor marchदिल्लीदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरी ट्रॅक्टर परेड
Previous Post

महाराष्ट्रातील गुणवंतांचा सरकारकडून सन्मान

Next Post

महाराष्ट्राच्या चित्ररथांनी पटकावले ४८ वर्षात १२ पुरस्कार!

Next Post
chitrarath

महाराष्ट्राच्या चित्ररथांनी पटकावले ४८ वर्षात १२ पुरस्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!