Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#शेतकरीआंदोलन दिल्लीतच नाही गल्लीतही कृषि कायद्यांविरोधात एल्गार!

थंडीने कुडकुडत उघड्या आभाळाखाली रात्र, मनात न्यायासाठी अंगार

January 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
Nasik Mumbai Farmer march-1

मुक्तपीठ टीम

 

केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावे व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता राज्यातूनही वाढता पाठिंबा मिळत आहे. डाव्या पक्षांच्या पुढाकाराने नाशिकहून काढलेला शेतकरी वाहन मोर्चा आज आता आझादमैदानात आहे, दुपारी तो मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. एकीकडे मुंबईत हे शेतकऱ्यांचे वादळ घोंघावत असतानाच पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दुपारी आझाद मैदानात पोहचणार आहेत. काँग्रेस, शिवसेनेचे मंत्रीही मोर्चात सहभागी होणार आहेत.

 

उघड्या आभाळाखाली थंडीने कुडकुडत, मनात न्यायासाठी अंगार!

Nasik Mumbai Farmer march-2

महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी वाहन मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून दोन दिवसांपूर्वी निघालेला मोर्चा काल रात्री मुंबईच्या आझादमैदानात पोहचला. रात्री शेतकऱ्यांनी घरून आणलेली भाकर खाऊन थंडीने कुडकुडत उघड्या आभाळाखाली रात्र काढली. पण सकाळी त्यांच्या घोषणांनी त्यांच्या मनातील न्यायासाठी लढण्याचा अंगार दाखवून दिला. आता शेतकऱ्यांच्या घोषणांनी दक्षिण मुंबईचा हा मुख्य परिसर दणाणून गेला आहे.

 

सर्व राजभवनांवर शेतकरी धडकणार

Nasik Mumbai Farmer march-3

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च २४ जानेवारी रोजी दुपारी सामील होईल.

 

राज्यभरातील शंभरापेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच संघटनांनी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.

 

आता आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा सुरु होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी २ वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.

 

प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला सलामीनंतर सांगता

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थिती विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होईल.

 

शेतकरी आंदोलकांच्या मागण्या:

  • शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा
  • शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा
  • वीज विधेयक मागे घ्या
  • कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा
  • वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा
  • महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या

Tags: farm billFarmer Delhi Protestmumbai farmer marchकृषी कायदेदिल्ली शेतकरी आंदोलनमुंबई शेतकरी मोर्चाराजू शेट्टी
Previous Post

“नागपूरला जगातील सर्वात सुंदर-स्वच्छ शहर बनवण्याचा संकल्प करावा”

Next Post

मंत्रालयातील फाइल बनावट शेरा घोटाळा, भाजपची सर्व फाइल्सच्या ऑडिटची मागणी

Next Post
Mantralaya File scam Ashish shelar

मंत्रालयातील फाइल बनावट शेरा घोटाळा, भाजपची सर्व फाइल्सच्या ऑडिटची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!