मुक्तपीठ टीम
अहमदनगरमधील नेवाशात एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभा ऊस पेटवून दिल्याचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कारखाना त्यांना मते देत नाहीत त्या शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना असं पाऊल उचलावं लागत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्या शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? pic.twitter.com/VyQD0yVe4H
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडक टीकेच्या फैरी झाडल्या आहेत, “दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्या शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे, असं त्यांनी म्हटले आहे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्यांनी जगायचेच नाही. pic.twitter.com/hs2QFq48HW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021
“आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्यांनी जगायचेच नाही,” अशी माहिती त्यांनी मांडली आहे.
आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्यांनी जगायचेच नाही. pic.twitter.com/hs2QFq48HW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021
त्यांच्या आरोपानुसार, “मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून नेवासा येथे हा प्रताप चालला आहे. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी हे चालवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. करतानाच किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका, असेही त्यांनी बजावले आहे.