मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यातील जाहीर सभेत आघाडी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. राज्यातील आघाडी सरकार हे सर्व सामान्यांचं नाही. सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. आता त्यांनी दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारू ५० टक्के कर कमी केला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे. राज्यातील सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ”, अशा शब्दात त्यांनी आघाडी सरकारच्या मद्याभिमुख धोरणाचे धिंडवडे काढले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे
- कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केली नाही.
- लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली.
- तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले.
- हे सरकार तेवढ्यावर थांबलेले नाही.
- आता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारू ५० टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला.
- त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे.
शेतकरी खतरे में वर बोलत नाहीत!
- फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हल्ला चढवला.
- रोज संविधान खतरे में म्हणतात, मात्र धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना पटोले बोलत नाही.
- हे सरकार रोज शेतकऱ्यांची वीज कापत असून आम्ही पाच वर्षात एकदाही वीज कापली नव्हती.
ओबीसी आरक्षण घालवण्याचे पाप आघाडीचेच!
- ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप याच सरकारने केले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती चौदा महिन्याच्या कालावधीत उलटून सुद्धा तयार केली नाही.
- महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले.
- या सरकारमध्ये ५० ओबीसी विरोधी मंत्री आहेत.
- आमच्या काळात हलबा समाजाला संरक्षण दिले गेले होते, या सरकारने हलबा संरक्षण न दिल्याने हलबा समाजाचे आरक्षणही धोक्यात आले आहे.