Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीस म्हणाले ‘ते’ ५५ लाख मलिकांचं संकट वाढवणार?

दाऊदच्या बहिणीला मलिकांनी ५५ लाख दिले, याचे ईडीकडे पुरावे - देवेंद्र फडणवीस

February 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Devendra fadanvis And nawab Malik

मुक्तपीठ टीम

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आघाडीचे नेते आक्रमक झालेत. पण अखेर न्यायालयात जे होईल ते पुराव्यांच्या आधारे. दिवाळीनंतर मलिकांविरोधात कारवाई झालेल्या जमीन प्रकरणाचे फटाके ज्यांनी फोडले त्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला नवा गौप्यस्फोट गंभीर आहे. अंडरवर्ल्ड माफिया डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचे ईडीकडे पुरावे आहेत असा दावा देवेंद्र फडणीवस यांनी केला आहे. तसं असेल तर मलिकांचं संकट वाढणार आहे. त्याचवेळी मलिकांच्या वकिलांनी केलेला पूर्वलक्ष्यी प्रभावाने कायदेशीर कारवाई करता येते का, हा मुद्दा त्यांच्या तांत्रिक बचावासाठी वरिष्ठ न्यायालयांमध्ये उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

 

फडणवीस पुन्हा उघड केलं संपूर्ण कनेक्शन!

  • “नवाब मलिक यांनी देशाच्या गद्दारांसोबत केलेला जमिनीचा व्यवहार गंभीर आहे.
  • ईडी आणि एनआयएनं गेल्या काही दिवसांमध्ये जॉईंट ऑपरेशन केली आहेत.
  • या प्रकरणी ईडीनं ९ ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं.
  • त्यातून अनेक लिंक्स बाहेर आलेल्या आहेत.
  • त्यातील एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे.
  • नवाब मलिक यांनी ज्या सरदार वली खान आणि सरदार पटेल यांच्याकडून जमीन घेतलीय तो हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे”, असं कनेक्शन आहे.

 

दाऊदच्या बहिणीला मलिकांनी ५५ लाख दिले, ईडीकडे पुरावे!

  • अतिक्रमण काढण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी मागण्यात आली आणि नंतर बदण्यात आली.
  • २५ लाख रुपयांचा सौदा झाला पण एकही रुपया पुढे देण्यात आले नाही.
  • हसीना पारकरला ५५ लाख रुपये देण्यात आले याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत.
  • ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीनं नवाब मलिकांना मिळाली. तसंच ते पैसे अंडरवर्ल्डला गेले, ते पैसे हसीना पारकर आणि दाऊदला मिळाले.

 

हा व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीन वेळा दहशतवादी हल्ले!

  • एखाद्या मंत्र्यांनं मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन विकत घेण्याचं कारण काय? मोठी गोष्ट ही आहे की हा व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीन वेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत.
  • मुंबईत जे हल्ले करतात, त्यांना आपण पैसे देणार असू तर ते निंदनीय आहे.

 

ईडीनं केलेली कारवाई नियमानुसारच…

  • म्हणून मी म्हणतोय की ईडीनं केलेली कारवाई नियमानुसारच आहे.
  • या प्रकरणात टेरर फंडिंग अँगल स्पष्टपणे दिसतोय.
  • हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे.
  • देशाच्या सुरक्षिततेसंबंधी महत्त्वाचं प्रकरण आहे.
  • कुठल्याही राजकीय पक्षानं राजकारण करु नये.
  • ईडीला पुढील कारवाई करु द्यावी.

 

मलिकांचा राजकीय पक्षानं राजीनामा घेतला पाहिजे!

  • मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन घेतली जात असेल तर त्याचा राजकीय पक्षानं राजीनामा घेतला पाहिजे.
  • तसंच राजीनामा घेणार नाही, असं जर महाविकास आघाडीचे नेते म्हणत असतील तर मात्र देशात हा चुकीचा संदेश जाईल, जो नक्कीच चांगला नसेल.

Tags: devendra fadnavisNawab Malikदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकहसीना पारकर
Previous Post

अखेर युद्ध! रशियाकडून युक्रेनवर हल्ले, जगभरात शेअर बाजार गडगडले! तेल भडकले!!

Next Post

दिव्यांग शेतकरी, कामगिरी भारी!

Next Post
दिव्यांग शेतकरी, कामगिरी भारी!

दिव्यांग शेतकरी, कामगिरी भारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!