मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून भाजपावर टीका केली आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते बुधवारी बारामतीमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रत्युत्तरही दिले आहे.
भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना संपवतो- शरद पवार
- शरद पवार म्हणाले,प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं.
- यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.
- भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो.
- कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता.
- प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता.
- आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे.
शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे- देवेंद्र फडणवीस
- शरद पवारांच्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
- शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे.
- त्यांच्याकडे ५० आमदार आहेत.
- तर आमच्याकडे ११५ आमदार आहेत.
- तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही दिले आहे.
- काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे १८ जणांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
- मला असं वाटतं की शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”