Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“तुमचे हिंदुत्व गदाधारी नव्हे, तर गधाधारी!” देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra vs uddhav

मुक्तपीठ टीम

गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी असल्याचे सांगून भाजपावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. तुम्ही गदाधारी आहात की नाही हे माहीत नाही, मात्र रोज सकाळी टीव्ही पाहिल्यानंतर तुम्ही गदाधारी नव्हे, तर गधाधारी आहात हे निश्चित लक्षात येते, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • “हिंदुत्व हे जगण्यासाठी असतं.
  • जगताना राष्ट्र प्रथम ही जी भावना आहे त्या भावना अत्यंत महत्त्वाच्या असतात.
  • या भावना आपल्या कर्तृत्वात उतरवणारे अमित शाह आहेत.
  • मगाशी अतिशय करेक्ट उल्लेख ज्योत्स्नाताईंनी केला की हिंदू असण्याचा त्यांना गर्व आहे.
  • या देशात आपण पाहिलं की काही लोकांना हिंदू असल्याची लाज वाटते.
  • आता तर नवीन हिंदुत्व आलंय.
  • घंटाधारी आणि गदाधारी.
  • मी असं म्हटलं घंटाधारी आणि गदाधारी असं म्हणताय, ते म्हणाले आम्ही गदाधारी आहोत.
  • मी त्यांना म्हटलं तुम्ही गदाधारी आहात की नाही माहित नाही, मात्र रोज सकाळी टीव्ही पाहिल्यानंतर तुम्ही ‘गधाधारी’ नक्कीच आहात हे आमच्या लक्षात येतं.
  • हिंदुत्व हे संकुचित नाही.
  • त्यामध्ये जातीभेदाला स्थान नाही.
  • हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता, हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता.
  • हाच भाव घेऊन हिंदुत्व जगणारे नेते कुणी असतील तर त्या व्यक्तीला अमित शाह असं म्हणतात.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं होतं?

  • “राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा देखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही.
  • तो निर्णय कोर्टाने दिला आहे.
  • राम मंदिर बांधतानाही तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवल्या आहेत.
  • तुमचं हिंदुत्व आहे कुठे? शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे ते हेच आहे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे.
  • हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी?
  • घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवायला जाऊ नये.
  • आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे.
  • हनुमान चालीसा पठण करायचं आहे खुशाल करा.
  • रामदासस्वामींनीही अप्रतिम मारूती स्तोत्र लिहून ठेवलं आहे.
  • भीमरूपी महारूद्रा.. भीमरूप आणि महारुद्र रूप काय असतं तर शिवसेनेच्या अंगावर आलात तर दाखवायला कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा.

Tags: BJPcm uddhav thackeraydevendra fadanvisHindutvaShivsenaदेवेंद्र फडणवीसभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनाहिंदुत्व
Previous Post

“शिवसेना मोठी हे मिथ संपलं…मोटा भाई कौन छे? अवघ्या महाराष्ट्राला कळलं!”

Next Post

“नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे”

Next Post
राज्यातील विविध रेल्वे विषयांसोबत मुंबईतील रेल्वे विषयक प्रकल्पांविषयी चर्चा 1

"नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!