मुक्तपीठ टीम
फेसबुक मेटासाठी त्यांच्या यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता अत्यंत महत्वाची आहे. यामुळेच, या सर्व बाबी लक्षात घेऊन, कंपनीने प्लॅटफॉर्मच्या डेटिंग सेवेत फेसबुकसाठी एआय आधारित फेस स्कॅन फिचर जोडले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे फिचर यूजर्सला त्यांच्या वयानुसार अनुभव देण्यास मदत करते. याशिवाय आता युजर्सकडे वयाची पडताळणी करण्याचा आणखी एक पर्याय असेल.
एआय आधारित फेस स्कॅन फिचर अमेरिकेतील फेसबुक डेटिंगवरील यूजर्ससाठी न्यू एज व्हेरिफिकेशन म्हणून उपलब्ध होईल. फेसबुकच्या डेटिंग सेवेसाठी यूजर्सचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यामुळे यूजर्स त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी एआय फेस स्कॅन पद्धत किंवा आयडी व्हेरिफिकेशन वापरू शकतात. हे फेसबुकला केवळ प्रौढ यूजर्सच डेटिंग सेवा वापरत आहेत याची पडताळणी करण्यास मदत करेल.
एआय फेस स्कॅन एज व्हेरिफिकेशन कसे करणार!
- मेटाने त्याचे एज व्हेरिफिकेशन तंत्रज्ञान जाहीर केले, जे कंपनीला यूजर्सचे वय आणि डिव्हाइसनुसार यूजर्सचे वय यांच्यातील फरक शोधण्यात मदत करते.
- डिव्हाइसला यूजर्सच्या वयाबद्दल शंका असल्यास, त्यांना व्हिडीओ सेल्फी किंवा आयडी प्रूफ या दोन पर्यायांचा वापर करून त्यांचे एज व्हेरिफिकेशन करण्यास सांगितले जाईल.
- व्हिडीओ सेल्फीची निवड केल्यास, सेल्फी रेकॉर्ड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन केले जाईल.
व्हिडीओ सेल्फी पाठवला नाही तर, आयडी प्रूफ दाखवावे लागणार!
- जर व्हिडीओ सेल्फीशिवाय दुसरी पद्धत अवलंबायची असेल, तर ओळखपत्र अपलोड करावे लागेल, ज्याचा वापर वयाची पुष्टी करण्यासाठी केला जाईल.
- हा आयडी एनक्रिप्टेड आणि सुरक्षितपणे संग्रहित केला जाईल.