मुक्तपीठ टीम
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनने भरलेली चारचाकी सापडल्याने खळबळ माजली आहे. अँटिलिया या निवासस्थानाजवळ ही गाडी उभी होती. या गाडीत काही नंबरप्लेट सापडल्या आहेत. ज्यातील काही नंबरांचे अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांशी साम्य असल्याचे सांगितले जाते.
मुंबईतला उच्चभ्रू परिसर पेडर रोडवर अँटेलिया आहे. याठिकाणी नेहमीच महागड्या गाड्यांची वर्दळ असते. मात्र स्कॉर्पिओ कार पार्क झाल्याचं दिसल्याने तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याचा संशय आला. या गाडीची तपासणी केल्यावर त्यात २५ जिलेटीनच्या कांड्या आढळल्या.
साम्य असलेल्या नंबर प्लेट
- या स्कॉर्पिओ गाडीची नंबर प्लेट तसेच त्यातील अन्य काही नंबर प्लेट आणि अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांचे नंबर
यांच्यात साम्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नेमका काय कट होता,याचे गूढ वाढले आहे. - काल पोलिसांनी मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती दिली होती. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं.
- दरम्यान, गरज पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल, असं राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय.