मुक्तपीठ टीम
कोकणात आल्यानंतर आता तुम्हाला झिप लाईनचा अनुभव घेता येणार आहे. कारण रत्नागिरीपासून जवळ असलेल्या आरे-वारे या बिचवर झिप लाईन सुरु करण्यात आली आहे. ८४ फूट उंच आणि १४०० मिटर लांब अशी ही झिप लाईन आहे. हे अंतर जवळपास १ मिनिटमध्ये पार करता येणार आहे. अतिशय माफक दरात समुद्राच्या साथीने कोकणात आल्यावर हा थ्रीलिंग अनुभव घेता येणार आहे.
प्रसिद्ध गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गावर आरे-वारे खाडी आणि किनाऱ्यावरील डोंगरावरील पर्यटन स्पॉट पर्यटकांच्या पसंतीस पडलेला आहे. हंगामामध्ये हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. याच ठिकाणी खाडीच्या किनाऱ्यापासून डोंगरावर १४०० फूट लांबीचा रोप बांधण्यात आला आहे. पर्यटनवृद्धीसाठी आरे-वारे बिचवर झिपलाइनचा प्रकल्प राबवला जात आहे. त्याचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले असून, लवकरच तो पर्यटकांना खुला करण्यात येईल. यामुळे पर्यटन व्यावसायाला चालना मिळू शकते.
आता ८४ फूट उंचीवरुन समुद्राचं सौंदर्य़ अनुभवता येणार आहे. कोकणात येणाऱ्या आणि अॅडवेंचर स्पोर्टसचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. रत्नदुर्ग माउंटेनिअरिंगचे सदस्य गणेश चौगुले, जितेंद्र शिंदे, दिनेश जैन यांनी पुढाकार घेत प्रकल्पाला चालना दिली. त्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, किरण सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
पाहा व्हिडीओ: