Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा” – सुभाष देसाई

जागतिक व्यंगचित्रदिनानिमित्त ‘व्यंगचित्र जत्रा' प्रदर्शन

May 5, 2022
in सरकारी बातम्या
0
World Cartoon day

मुक्तपीठ टीम

जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टुनिस्ट कम्बाईनच्यावतीने भरविण्यात आलेल्या ‘व्यंगचित्र जत्रा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे सचिव तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या विषयावर आधारित हे प्रदर्शन असून महाराष्ट्रासह देशभरातील व्यंगचित्रकारांसोबत रशिया, चीन, युक्रेन, युरोप, इराक आदी देशांतील व्यंगचित्रकारांनी यात सहभाग नोंदविला आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना व्यंगचित्रकार असल्याचा नेहमी अभिमान वाटे. त्यांनी व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांवर कायम प्रेम केले. व्यंगचित्रकारांच्या घटत्या संख्येबाबत ते चिंतीत होते. त्यात राजकीय व्यंगचित्रकार निर्माण होत नसल्याची खंत ते व्यक्त करत. आजही तिच परिस्थिती कायम आहे. दरम्यान, आम्ही मार्मिकचे स्वरुप बदलले असून राजकीय विषयावर चपखल भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रकारांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या या प्रदर्शनातून हा शोध पूर्ण होईल, अशी अपेक्षा मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक वेगाने पूर्ण होत असून या ठिकाणी व्यंगचित्रासाठी स्वतंत्र दालन असेल. त्या ठिकाणी माहिती, प्रदर्शन, कार्यशाळा भरविण्यात येईल.

यावेळी कार्टुनिस्ट कंम्बाईनचे अध्य़क्ष संजय मेस्री यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि कार्टुन या विषयी सखोल माहिती दिली. तसेच व्यंगचित्र संस्था निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी कार्टुन अकादमीसाठी जागा उपलब्ध होईल, असे नमूद केले. यावेळी माजी महापौर श्रध्दा जाधव, चारुहास पंडीत आदी उपस्थित होते

दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन परिसरात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ते आज व उद्या सकाळी 10 ते 8 या वेळेत खुले असेल.


Tags: Cartoon Fairsubhash desaiWorld Cartoon Dayजागतिक व्यंगचित्रदिनव्यंगचित्र जत्रासुभाष देसाई
Previous Post

“सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक नको!”

Next Post

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
Ajit Pawar Says list of forest rights claims beneficiaries must published

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!