Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसेतून राष्ट्रवादीत आल्याचं फळ मिळणार, रुपाली ठोंबरे महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rupali Patil Thombare

मुक्तपीठ टीम

नुकत्याच मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. रूपाली पाटील ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

काय म्हणाल्या रुपाली पाटील?

  • रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या त्या म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी काम करताना ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पेलली.
  • एका व्यक्तीला दोन पदे असू नयेत म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.
  • महिलांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी तत्परतेने काम केलं आहे.
  • महिला प्रदेशाध्यक्षपदी मला जर संधी मिळाली तर मी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेन.
  • ज्या विश्वासाने मला पक्षात प्रवेश दिला तो विश्वास सार्थ करेन.

 

रुपाली चाकणकरांकडे महिला आयोगाची जबाबदारी…

  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
  • त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता.
  • गुरुवारी त्यांनी राजीनामा दिला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.

Tags: rupali chakankarRupali patil thombareराष्ट्रवादी काँग्रेसरुपाली चाकणकररुपाली ठोंबरे
Previous Post

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post

सौम्य अनिल देसाईंची जहाल टीका: “बिर्याणीवर ताव मारणारे ‘जनाब’ फडणवीस!”

Next Post
anil desai calls fadanvis as janab

सौम्य अनिल देसाईंची जहाल टीका: "बिर्याणीवर ताव मारणारे 'जनाब' फडणवीस!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!